सेलू रेल्वेस्थानकावर दुर्घटना; गाडीत चढतांना महिलेचा मृत्यू, गाडी कमी वेळ थांबल्याने अपघाताचा आरोप

सेलू रेल्वेस्थानकावर दुर्घटना; गाडीत चढतांना महिलेचा मृत्यू, गाडी कमी वेळ थांबल्याने अपघाताचा आरोप

अपघातामुळे दोन तास हैदराबाद गाडी सेलू रेल्वे स्थानकावर खोळंबली

सेलू जि.परभणी : सेलू रेल्वे स्थानकावरून हैदराबादकडे जाणाऱ्या गाडीत वयोवृद्ध महिला सायदा बी शेख महमूद (वय ६० वर्षे रा.सातोना जिल्हा जालना) गाडीत बसताना, रेल्वे खाली आल्यामुळे मृत्यू पावल्याची घटना घडली. दाखल होताच क्षणातच रेल्वे गाडी निघाल्यामुळे रेल्वे गाडीतील प्रवासी उतरताना व रेल्वे स्थानकावरून प्रवाशांची गाडीत बसताना मोठी गैरसोय झाली. दरम्यान या धावपळीमध्ये सातोना येथील महिला स्वतःच्या मुलाकडे हैदराबाद येथे जाताना सेलू रेल्वे स्थानकातून हैदराबादसाठी रवाना होणार होती, मात्र गाडी तात्काळ निघाल्यामुळे स्वतः जवळील सामान गाडीत टाकून ती गाडीत बसताना गाडीच्या खाली आली. हा अपघात इतका भयानक होता, असे प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले.
या बाबत माहिती अशी की, औरगाबाद येथून हैदराबादकडे जाणारी हैदराबाद एक्सप्रेस गाडी क्रमांक १७६५० ही रेल्वे गाडी नियोजित वेळेपेक्षा सव्वा तीन घंटे सेलू रेल्वे स्थानकावर मंगळवारी, २७ फेब्रुवारी रोजी उशीराने आली असता. लागलीच काही सेकंद मध्ये सुरु झाली. यामुळे चढणारे व उतरणारे प्रवाशांमध्ये गोधळ निर्माण झाला. त्यामध्ये काही प्रवासी घाबरून उतरणारे यांनी उड्या मारल्या. तर काहीनी आपल्या सोबतचे सामान फेकले. सदरील रेल्वे गाडी खूप कमी वेळ सेलू रेल्वेस्थानकावर थांबल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.
औरंगाबाद रेल्वे स्थानकावरून हैदराबाद कडे जाणारी रेल्वे गाडीनंबर १७६५० हिचा सेलू रेल्वे स्थानकावर नियमित येण्याचा वेळ सायंकाळी ६ वाजून५ मिनिटे व निघण्याची वेळ सायंकाळी ६वाजून ६ मिनिटे असा असताना, तब्बल सव्वा तीन घंटे सदरील रेल्वे गाडी उशिराने धावत होती. सेलू रेल्वे स्थानकावर रात्री ०९ वाजून २१ मिनिटांनी दाखल झाली. आणि दाखल होताच क्षणातच रेल्वे गाडी निघाल्यामुळे रेल्वे गाडीतील प्रवासी उतरताना व रेल्वे स्थानकावरून प्रवाशांची गाडीत बसताना मोठी गैरसोय झाली. दरम्यान या धावपळीमध्ये सातोना येथील महिला स्वतःच्या मुलाकडे हैदराबाद येथे जाताना सेलू रेल्वे स्थानकातून हैदराबादसाठी रवाना होणार होती, मात्र गाडी तात्काळ निघाल्यामुळे स्वतः जवळील सामान गाडीत टाकून ती गाडीत बसताना गाडीच्या खाली आली. हा अपघात इतका भयानक होता, असे प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले. यात रेल्वे प्रशासनाच्या तात्काळ गाडी हलवण्याच्या चुकीमुळे सदरील महिलेला प्राण गमवावे लागले तसेच सेलू रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एकवर हैदराबाद वरून मुंबईकडे जाणारी देवगिरी एक्सप्रेस या गाडीचे डिस्प्ले सुरू होते. प्रत्यक्षदर्शी प्रवासी बोलत होते. त्यामुळे परभणी कडे जाणारे प्रवासी निवांत रेल्वे स्थानकावर बसले होते. मात्र रेल्वे स्थानकावरून प्रवाशांना कसलीही सूचना न मिळताऔरंगाबाद येथून हैदराबाद कडे जाणारी हैदराबाद एक्सप्रेस ही गाडी फलाट क्रमांक एकवर रात्री ९ वाजून २१ मीनीटांत प्लॉट फ्रॉम क्रमांक 1वर दाखल झाली. त्यामुळे परभणी व हैदराबाद कडे जाणाऱ्या प्रवाशांची धावपळ झाली. आणि फलाट क्रमांक 01वरील डिस्प्ले वेगळा आणि फलाटक्रमांक एकवर वेगळीच गाडी उभी ठाकल्यामुळे प्रवासी गोंधळून गेले .या धावपळीत सेलू रेल्वे स्थानकावरून बसणाऱ्या प्रवासी महिलेला प्राण गमवावे लागले. सदरील महिला मूळ राहणार सातोना येथील असून केवळ सातोना येथील रेल्वे स्थानकावर औरंगाबाद होऊन हैदराबाद कडे जाणारी हैदराबाद एक्सप्रेस रेल्वे गाडी थांबत नसल्याकारणाने सदरील महिला सेलू रेल्वे स्थानकावरून बसण्यासाठी इथे आली होती. मात्र फलाट क्रमांक एक वरील डिस्प्ले देवगिरी एक्सप्रेस चा दाखवत होता. अशाही परिस्थितीत हैदराबाद एक्सप्रेस गाडी असल्याकारणाने सदरील महिलेने आपली स्वतःजवळील लगेज गाडीत ठेवून ,गाडीत चढण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत रेल्वे गाडी सुरू झाली. आणि सदरील महिला रेल्वेखाली जाऊन तिला स्वतःचे प्राण गमवावे लागले. व इतर प्रवासी यांना पन दुखापत झाली यात रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणा भोवला,असे प्रवासी बोलत होते. कारण सव्वातीनघंटे उशिराने धावणारी रेल्वे, सेलू रेल्वे स्थानकावरून प्रवासी घेण्यासाठी काही सेकंद सेलू रेल्वे स्थानकावर थांबली. आणि लगेच पुढच्या प्रवासासाठी सुरू झाल्या कारणाने सदरील महिलेला आपले प्राण गमावावे लागले आहे .यामुळे सदरील घटनेनंतर महिलांच्या घरचे नातेवाईक सेलू रेल्वे स्थानकावर आले. व त्यांनी तक्रार पुस्तकामध्ये तक्रार केली. पुढील संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तब्बल पावणे दोन घंटे कालावधी लागला. आणि हैदराबाद एक्सप्रेस रेल्वे गाडी सेलू रेल्वेस्थानकावरुन,०९.२१ मिनिटांपासून ११ वाजून ०१ मिनिटापर्यंत उभी राहिली. रेल्वे गाडीतील प्रवासी देखील कंटाळले होते. मात्र सदरील घटना दुःखद आहे. घटनेमुळे सर्वच प्रवाशी हळहळ व्यक्त करत होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!