मराठी राजभाषा दिनानिमित्त नाटिकेची सादरीकरण ; विवेकानंद विद्यालयात कार्यक्रम
सेलू जि.परभणी : येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात मराठी राजभाषा दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक शंकर शितोळे, प्रमुख पाहुण्या म्हणून शालेय समिती अध्यक्ष करुणा कुलकर्णी होत्या. इयत्ता चौथीच्या प्रगती वर्गाच्या मुलांनी सूत्रसंचालन पद्य प्रास्ताविक आभार सादर केले.आदित्य गिरी व समृद्धी काष्टे यांनी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पहिली ते चौथीच्या विभाग प्रमुख रागिणी जकाते, दिपाली पवार, शारदा पुरी, काशिनाथ पांचाळ, चेतन नाईक , चंदू कव्हळे, अभिजीत पाचंगे यांनी परिश्रम घेतले.