अपघातात तरूण लेकाचा मृत्यू; आई गंभीर जखमी ; सेलू-पाथरी रस्त्यावरील दुर्घटना

अपघातात तरूण लेकाचा मृत्यू; आई गंभीर जखमी ; सेलू-पाथरी रस्त्यावरील दुर्घटना

अपघातात तरूण लेकाचा मृत्यू; आई गंभीर जखमी ; सेलू-पाथरी रस्त्यावरील दुर्घटना

सेलू जि.परभणी : सेलू-पाथरी रस्त्यावरील राजनंदिनी हाॅटेल जवळ बुधवारी (२८ फेब्रुवारी) रात्री आठच्या सुमारास ऊसाच्या उभ्या ट्रक्टरला दुचाकीची धडक होऊन अपघात झाला. यामध्ये तरुण लेकाचा मृत्यू झाला असून, आई गंभीर जखमी झाली आहे. तिला परभणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेबाबत माहिती अशी की, भुजंग बाबासाहेब कटारे (वय २६, रा. धनेगाव ता.सेलू) हे बुधवारी दुचाकीवरून (क्रमांक एमएच. एच.२० एफ. ए. ८६५६ ) आई द्वारकाबाई कटारे यांना सेलू् येथे दवाखान्यात घेऊन आले होते.‌ काम आटोपून ते परत गावाकडे जात असताना सेलू-पाथरी रस्त्यावरील राजनंदिनी हाॅटेल जवळ उभ्या असलेल्या ऊसाच्या दोन ट्राली ट्रक्टरला (क्रमांक-एम. एच. २२ ए. डी.२५७१) दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात भुजंग कटारे यांचा मृत्यू झाला असून द्वारकाबाई कटारे गंभीर जखमी झाल्या. त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे नेण्यात आले. वैभव कटारे यांच्या तक्रारीवरून सेलू पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुजंग कटारे यांच्यावर गुरूवारी धनेगावात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई- वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!