ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या शाखांतून पाच मार्च पासून ठेवीदारांना पैसे देणार; शनिवारपासून सर्व शाखा सुरू…
Credit : DHAIRASHIL
बीड /परभणी दि.१ मार्च : ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या सर्व शाखा उद्यापासून सुरू होणार असून याबाबत सुरेश कुटे आणि संबंधित यंत्रणेची प्रशासकीय बैठक पार पडली असून ५ मार्चपासून प्रत्येकांचे पैसे देण्यास सुरूवात होणार असून हे पैसे दोन टप्प्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
ज्ञानराधाचे सर्वेसर्वा सुरेश कुटे यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर व्हिडीओ वायरल करून आपण पाच तारखेपर्यंत सर्वांचे पैसे देणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार सुरेश कुटे आणि संबंधित यंत्रणाची आज (दि.१) बैठक पार पडली असून या बैठकीत उद्यापासून सर्व शाखा सुरळीत सुरू होतील आणि ५ मार्चपासून सर्व खातेदारांचे पैसे देण्यात येणार आहेत. हे पैसे दोन टप्प्यात देण्यात येणार असून ५ मार्चला पहिला आणि एप्रिल महिन्यात दुसरा टप्पा वाटप सुरू होणार असल्याची माहिती मिळाली असून यामध्ये कोणाला किती निधी दिला जाणार हेा ४ मार्चपासून नोटीस बोर्डवर समजणार असून कशा पद्धतीने वाटप होईल याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. ५ मार्चनंतर ठेवीदारांना ठेवी परत मिळण्यास सुरूवात होणार आहे. दरम्यान कोणाला किती रक्कम मिळेल याबाबत या बैठकीत ठरले नसून ४ मार्च रोजी याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे.
दरम्यान, ५ मार्चपासून ठेवीदारांचे वाटप केले जाणार असून सुरेश कुटे यांनी खातेदारांना दिलेला शब्द पूर्ण होताना दिसत आहे. त्यामुळे प्रत्येक खातेदारांचे पैसे मिळणारच असून याबाबत काळजी करण्याचे कारण नसल्याचे सुरेश कुटे यांनी वारंवारं सांगितले आहे. त्यामुळे सुरेश कुटे यांनी दिलेला शब्द खरा होणार असल्याचे यातून दिसून येत आहे.