Swami Govinddev Giriji Maharaj – जीवन साफल्यासाठी आत्मविश्वास जागवत ठेवा ; सेलूतील व्याख्यानात स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचे मत
नूतन विद्यालय शिक्षण संस्था, बिहाणी चॅरिटेबल ट्रस्टचा संयुक्त उपक्रम, श्रोत्यांची मोठी उपस्थिती
किती कमावले यापेक्षा जीवनाची सार्थकाता मह्त्त्वाची आहे, जीवन कोणाशी जोडले यावरच जीवनाचे साफल्य अवलंबून आहे. स्व:ताचा आदर, एकाग्रता, ध्येयावर ठामपणे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. ज्या वयात चेतना शिल्लक आहेत. तोपर्यंत त्याचा उपयोग करणे गरजेचे आहे. जीवनाचे लक्ष्य काय आहे, हे ठरवून, कोणतेही क्षेत्र निवडा पण त अंतःकरणाला विचारून निवडा. यश मिळतेच मिळते, असे मत मांडून राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी पालकांनी आपली मते आपल्या मुलांवर लादू नये. त्याच्यातील क्षमता ओळखून क्षेत्र निवडू द्यावे, अले आवाहन केले,

सेलू जि.परभणी : मानवी जीवन हा विश्वातील सर्वात अनमोल ठेवा आहे. मानव देह अमूल्य आहे. याची जाणीव, अमूल्यता जाणून केवळ चालत नाही तर,तर आपल्याला ते पटावे लागते. म्हणूनच जीवनाची सार्थकता, साफल्यप्राप्तीसाठी देह दीर्घकाळ सांभाळता आले पाहिजे. त्यासाठी वैदिक पद्धतीने जीवन जगण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती, संयम, संतुलन, आहार-विहार आणि सततचा आत्मविश्वास जागवत ठेवावा लागेल, असे मत श्रीक्षेत्र अयोध्या श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष तथा राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी शनिवारी ( दोन मार्च) सायंकाळी व्यक्त केले.
सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था व बी.बी.बिहाणी चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त सहकार्याने श्रीसाई मंदिरात आयोजित श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमालेचे ४७ वे पुष्प स्वामीजींनी गुंफले. प्रारंभी श्रीरामजी भांगडिया प्रतिमा पूजन व प्रकाश पूजन झाले. ‘जीवन साफल्य ‘ हा स्वामीजींच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.सत्यनारायण लोया होते. आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, संयोजक प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, प्रा.सुभाष बिराजदार यांची उपस्थिती होती.
माणसाने सतत आपल्या धेय्याप्रती सजग राहिले पाहिजे. नशीबांच्या गप्पा म्हणजे नपुंसकतेच्या गप्पा आहेत, असे सांगून स्वामीजींनी छत्रपती शिवाजी महाराज, संत रामदास स्वामी, रविंद्रनाथ टागोर, संत कबीर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, अब्राहम लिंकन आदीं महापुरुषांच्या जीवनातील धैय्याप्रती कार्याची महानता दरर्शविणारी उदाहरणे सांगितली. स्वामीजी म्हणाले, वयाच्या चौदाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली . हिंदू राष्ट्र, हिंदू राज्याची स्थापना म्हणजेच हिंदू साम्राज्याची स्थापना होय. वयाच्या सोळाव्या वर्षी स्वातंत्र्य वीर सावरकरांनी मातृभूमी करिता प्रतिज्ञा केली. वयाच्या ज्या वयात चेतना जागृत असतात. तोपर्यंत आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावे लागतातच, असे नमूद करून आनंददायी जीवनासाठी भगवंतांची भक्ती आवश्यक आहे. भक्ती करता आली की जीवन धन्य होते. वैदिक पद्धतीने शंभर वर्षे जीवन जगता येते. त्यादृष्टीने प्रत्येकाने देहाचा सांभाळ करणे आवश्यक आहे, असेही स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी नमूद केले.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक सुभाष बिरादार यांनी केले. प्रारंभी सच्चिदानंद डाखोरे, गिरीश दीक्षित, गंगाधर कान्हैकर व संचाने स्वागत गीत गायीले. याप्रसंगी राज्य सरकारचा उत्कृष्ट उद्योजक पुरस्कारप्राप्त नंदकिशोर बाहेती यांचा सत्कार तसेच वाढदिवसानिमित्त जयप्रकाश बिहाणी यांचे अभीष्टचिंतन करण्यात आले. साईबाबा मंदिर संस्थानच्या वतीने माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी सत्कार केला. यावेळी मुकेश बोराडे, राजेंद्र पवार, मिलिंद सावंत, प्रभाकर सुरवसे आदींची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी विविध समित्यांचे सदस्य, शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. व्याख्यानाला महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वृत्तांकन – बाबासाहेब हेलसकर, छायाचित्रे – सदाशिव महाजन, किरण फोटो
व्हिडिओ – फुलसिंग गावीत – जीवन साफल्य – स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज
किती कमावले यापेक्षा जीवनाची सार्थकाता मह्त्त्वाची आहे, जीवन कोणाशी जोडले यावरच जीवनाचे साफल्य अवलंबून आहे. स्व:ताचा आदर, एकाग्रता, ध्येयावर ठामपणे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. ज्या वयात चेतना शिल्लक आहेत. तोपर्यंत त्याचा उपयोग करणे गरजेचे आहे. जीवनाचे लक्ष्य काय आहे, हे ठरवून, कोणतेही क्षेत्र निवडा पण त अंतःकरणाला विचारून निवडा. यश मिळतेच मिळते, असे मत मांडून राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी पालकांनी आपली मते आपल्या मुलांवर लादू नये. त्याच्यातील क्षमता ओळखून क्षेत्र निवडू द्यावे, अले आवाहन केले,