स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचे सेलूत आज व्याख्यान

स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचे सेलूत आज व्याख्यान

नूतन विद्यालय शिक्षण संस्था, बी.बी.बिहाणी चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त उपक्रम

सेलू जि.परभणी : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था व बी.बी.बिहाणी चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त सहकार्याने श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमालेचे श्रीसाई मंदिरात शनिवारी ( दोन मार्च ) सायंकाळी ६.३० वाजता आयोजन करण्यात आले आहे.

श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमालाचे ४७ वे पुष्प श्रीराम जन्मभूमी न्यास, श्रीक्षेत्र अयोध्याचे कोषाध्यक्ष स्वामी गोविन्ददेव गिरीजी महाराज गुंफणार आहेत. ‘जीवन साफल्य ‘ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सत्यनारायण लोया असतील. संयोजक प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमालेचे संयोजक प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, सहसंयोजक प्रा. सुभाष बिराजदार यांची उपस्थिती राहणार आहे. यशस्वीतेसाठी विविध समित्यांचे सदस्य, शिक्षक व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!