धनेगावमध्ये उभारणार महात्मा फुले दांपत्याचे स्मारक; ग्रामपंचायतीकडून जागा उपलब्ध 

धनेगावमध्ये उभारणार महात्मा फुले दांपत्याचे स्मारक; ग्रामपंचायतीकडून जागा उपलब्ध 

सेलू जि.परभणी : सेलू तालुक्यातील धनेगाव येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नियोजित पुतळ्यासाठी ग्रामपंचायत धनेगावच्या वतीने जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नियोजित जागेवरती नाम फलकाचे अनावरण करण्यातआले.

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची जाणीव भावी पिढ्यांना कळावी. या उद्देशाने या स्मारकचे काम हाती घेण्यात येणार आहे. अशी माहिती श्याम कटारे यांनी दिली. याप्रसंगी सखाराम कटारे माळी महासंघ सेलू तालुका अध्यक्ष शाम कटारे उपसरपंच पवन कटारे, माजी सरपंच सुदाम कटारे वाल्मीक कटारे, संतोष कटारे आसाराम थोरे अमोल कटारे रामप्रसाद कटारे, छगन कटारे, गणेश कटारे, महादेव थोरे व गावकरी मंडळी यांची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!