सेलू शहरात ११५ कोटींचे रस्ते काम सुरू ; आमदार मेघना बोर्डीकर यांचा पुढाकार

सेलू शहरात ११५ कोटींचे रस्ते काम सुरू ; आमदार मेघना बोर्डीकर यांचा पुढाकार

‘नगरोत्थान’अभियानातून ११५ कोटींच्या रस्तेकामांचा शुभारंभ

महायुतीचाच उमेदवार विजयी होणार : सेलू शहरात न्यायालय, पोलिस ठाणे, बांधकाम विभाग इमारतीचे काम प्रगती पथावर आहे. लहान-मोठी शंभक कोटी रुपयांसह शहरात जवळपास पाचशे कोटींची कामे सुरू आहेत., तर तालुक्यात विविध सरकारी योजनेच्या माध्यमातून एकूण बाराशे कोटींची कामे डबल इंजिन सरकारमुळे  सुरू आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष विकासाकडे अधिक लक्ष केद्रीत  करणार पक्ष आहे. आगामी लोकसभा, विधानसभा  व अन्य निवडणुकीत परभणी जिल्हयात महायुतीचेच उमेदवार विजयी होणार याची खात्री आहे.- रामप्रसाद बोर्डकर, भाजपचे ज्येष्ठ नेते

सेलू शहरात ११५ कोटींचे रस्ते काम सुरू ; आमादर मेघना बोर्डीकर यांचा पुढाकार

सेलू (जि.परभणी) : आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या विशेष प्रयत्नातून सेलू शहरासाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत ११५ कोटी रूपयांच्या प्रमुख १८ रस्ते कामे आणि विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा सोमवारी, ४ मार्च रोजी सकाळी लोकमान्य टिळक पुतळा परिसरात पार पडला. या मध्ये वर्षानुवर्षे दुर्लक्षित रस्त्यांचा अधिक समावेश आहे. या वेळी नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
भारतीय जनता पक्ष आणि आर.बी. घोडके इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लिमिटेडच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर होते. या प्रसंगी आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा समन्वयक डॉ.केदार खटिंग, आर.बी.घोडके, देविदास जाधव, बाजार समितीचे संचालक डॉ.संजय रोडगे, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड.दत्तराव कदम,अशोक अंभोरे, रामेश्वर राठी, अजिज खाँ पठाण, विजय बिहाणी, महेश खारकर आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या रस्ते कामांमध्ये प्रामुख्याने जिंतूर रोड ते परभणी रोड, वालूर नाका ते उपजिल्हा रुग्णालय रेल्वे लाईन हद्द रस्ता, परभणी रोड ते जायकवाडी गेट, जायकवाडी गेट ते भांडवले यांचे घर, जिंतूर रोड ते एस.डी.ओ. ऑफिसपर्यंत रस्ता, जिंतूर रोड ते ३० मीटर रुंद वळण डिपी रस्त्यापर्यंत, परभणी रोड ते साईट क्रमांक ३६, भाग क्रमांक चार,‌ प्रभाग क्रमांक अंतर्गत रस्ता, राज्य मार्ग -२५४ ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर रस्ता, जुन्या रेल्वे पुलाखालुन ते सुनुल चव्हाण यांचे घर, गणेश नगर ते ढोरवाडा रस्ता, मठगल्ली कॉर्नर ते क्रांती चौक ते घौरी यांचे घर, सोळुंके आबा ते आवटे यांचे घर, मोरेश्वर रेस्टॉरंट ते स्वामी विवेकानंद शाळा, जिंतूर रोड ते पोद्दार इंग्लिश स्कूल रहमानिया मस्जिद ते राजीव गांधीनगर,‌जिल्हा परिषद शाळा प्रभाग क्रमांक पाच‌‌ ते सोनी यांचे घर आदी रस्त्यांचे सिमेंट क्रॉंकिटीकरण होणार आहे. या निमित्ताने नागरिकांनी मनोगतातून आमदार बोर्डीकर यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केे. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, ॲड.श्रीकांत वाईकर, चंद्रप्रकाश सांगतांनी, निलेश बिनायके, द्वारकादास झवंर, डॉ.सुनील कुलकर्णी, सुरेश भुमरे,अशोक खताळ, बबीता ठाकूर, वनिता चफेकर, नंदकिशोर बहिवाल, श्रीवल्लभ लोया, संजय लोया, रूपाली ठाकूर,संजय लोया, रामेश्वर राठी,रवी डासाळकर, दिनकर वाघ, माऊली ताठे, कपिल फुलारी, अर्जून बोरूळ, प्रसाद खारकर, विठ्ठल शरद, आकात, प्रसाद खारकर, संध्या चिटणिस, अभय महाजन, संजय भाग्यवंत, शिवहरी शेवाळे, ॲड कृष्णा शेरे, गणेश काटकर,ॲड.रामेश्वर शेवाळे, श्रीकांत वाईकर, मुकंद शिवाजी खेडकर,  भाऊ सोनवणे , अजय डासाळकर आदींसह नागरिकांची मोठी उपस्थिती होती.‌ याप्रसंगी विविध संस्थांतर्फे आमदार बोर्डीकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अशोक अंभोरे यांनी केले.‌ सूत्रसंचालन मोहन बोराडे यांनी केले. ॲड दत्तराव कदम यांंनी आभार मानले.

संधाचे सोने करू

आमदार मेघना बोर्डीकर यांना विकासा दूरदृष्टी आहे. आर.बी.घोडके इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातन राज्यभर दर्जेदार जलसिंचन, बंधारे व रस्ते कामांचा अनुभव आहे. गुणवत्ता, दर्जा आणि विकास या त्रिसूत्रीवर काम केले जाते. यानिमित्ताने माझ्या सेलू गावातीच, तालुक्यातील रस्ते करण्याची संधी मिळाली त्याचे निश्चतिच सोने करून वेळेत दर्जेदार काम करणार आहे. – रामप्रसाद घोडके, संचालक आर.बी.घोडके इन्फ्रास्ट्रक्चर, परभणी

सेलू शहरात ११५ कोटींचे रस्ते काम सुरू ; आमादर मेघना बोर्डीकर यांचा पुढाकार

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!