सेलूत संजय गांधी निराधार योजनेचे माहिती शिबिर शुक्रवारी

सेलूत संजय गांधी निराधार योजनेचे माहिती शिबिर शुक्रवारी

लाभ घेण्याचे आवाहन संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी केले.

सेलू : आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे व माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सेलू तालुक्यातील निराधार, वंचित, विधवा व गरजू नागरिकांसाठी शुक्रवार दिनांक 8 मार्च 2024 रोजी सकाळी 10:30 वाजता शिबिराचे आयोजन श्रीराम प्रतिष्ठान, विद्याविहार संकुल, रवळगाव रोड, सेलू येथे केले आहे. याठिकाणी सेलू तालुक्यातील सर्व गावातील सरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आपण आपल्या आवश्यक त्या कागदपत्रासह उपस्थित राहावे. यावेळी प्राप्त झालेले अर्ज पुढील बैठकीमध्ये तपासून नियम, अटी व शर्तीच्या अधीन राहून पात्र केले जातील.
तरी सेलू तालुक्यातील गरजू व्यक्तींनी या शिबिरामध्ये उपस्थित राहून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!