एकही निराधार अनुदानापासून वंचित राहू नये :डॉ. संजय रोडगे; संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक 

एकही निराधार अनुदानापासून वंचित राहू नये : डॉ.संजय रोडगे; संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक 

सेलू तालुक्यातील अपंग, निराधार, विधवा व गरजू व्यक्तींचे एकूण 600 अर्ज या ठिकाणी प्राप्त झाले होते. त्यापैकी योजनेच्या नियम, अटी व शर्तीच्या अधीन असलेले 300 च्या वरअर्ज पात्र झाले. येत्या शुक्रवारी दिनांक 8 मार्च 2024 रोजी सकाळी 10:30 वाजता श्रीराम प्रतिष्ठान, विद्याविहार संकुल, रवळगाव रोड, सेलू येथे उर्वरित निराधार गरजू जनतेसाठी शिबिराचे आयोजन केले आहे. याठिकाणी सेलू तालुक्यातील सरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक तहसीलदार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आपण आवश्यक त्या कागदपत्रासह उपस्थित राहावे. यावेळी प्राप्त झालेले अर्ज पुढील बैठकीमध्ये तपासून नियम, अटी व शर्तीच्या अधीन राहून पात्र केले जातील.

सेलू : येथील तहसील कार्यालय येथे संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक संपन्न झाली.सेलू तालुक्यातील निराधार, वंचित, विधवा व गरजू व्यक्ती संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता ग्रामपातळीवर तलाठी, ग्रामसेवक मंडळ अधिकारी, यांनी घ्यावी व सर्व गरजू पात्र असलेल्या व्यक्तींचे अर्ज सेतू सुविधा केंद्र मार्फत ऑनलाईन व आपल्या गावातील तलाठ्याकडे दाखल करावेत अशा सूचना यावेळी बैठकीत संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी प्रशासनाला दिल्या.
या बैठकीला तहसीलदार श्री. दिनेश झांपले, गटविकास अधिकारी श्री. गणेश मंडलिक, अशासकीय प्रतिनिधी कु. कमल दीपक चव्हाण, श्री. तुकाराम नामदेव घनवटे, श्री विलास सोनवणे, श्री. विष्णू त्र्यंबक बुधवंत, श्री. दत्ता रघुनाथ गिरी, सौ. ज्योती राजेश मोगल, श्री. दत्तराव ज्ञानोजी जाधव, आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. संजय रोडगे म्हणाले की, या योजनेअंतर्गत सर्व निकष अटी व अटीची पूर्तता करणाऱ्या 300 च्या वर गरजू लाभार्थ्यांचे अर्ज पात्र झाले. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रशासनाला सोबत घेऊन सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर राहील. समाजातील निराधार व गरजू जनतेची सेवा करण्याची संधी यानिमित्त मिळाली आहे. मागिल 20 वर्षापासून वैद्यकीय, सामाजिक,शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रामध्ये घेतलेली जबाबदारी ही अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडण्याचा माझा मानस आहे. तसेच या योजनांची सर्व प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने या ठिकाणी आपण सर्वांसमोर मांडली आहे. यापुढेही समाजाची सेवा करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहील.सेलू तालुक्यातील वंचित, निराधार व गरजू व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज तयार करून ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी यांची सही घेऊन तहसीलदार यांचे रहिवासी दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा त्यांच्याकडे दारिद्र रेषेखालचे प्रमाणपत्र दाखला आहे. त्यांना उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. अशा सर्व गरजू पात्र व्यक्तींनी आपल्या जवळच्या सेतू सुविधा केंद्र मार्फत आपला अर्ज करावा असे आवाहन समितीचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे व तहसीलदार श्री. दिनेश झांपले यांनी केले.

सेलू तालुक्यातील अपंग, निराधार, विधवा व गरजू व्यक्तींचे एकूण 600 अर्ज या ठिकाणी प्राप्त झाले होते. त्यापैकी योजनेच्या नियम, अटी व शर्तीच्या अधीन असलेले 300 च्या वरअर्ज पात्र झाले. येत्या शुक्रवारी दिनांक 8 मार्च 2024 रोजी सकाळी 10:30 वाजता श्रीराम प्रतिष्ठान, विद्याविहार संकुल, रवळगाव रोड, सेलू येथे उर्वरित निराधार गरजू जनतेसाठी शिबिराचे आयोजन केले आहे. याठिकाणी सेलू तालुक्यातील सरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक तहसीलदार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आपण आवश्यक त्या कागदपत्रासह उपस्थित राहावे. यावेळी प्राप्त झालेले अर्ज पुढील बैठकीमध्ये तपासून नियम, अटी व शर्तीच्या अधीन राहून पात्र केले जातील.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!