सेलूत श्री नर्मदेश्वर देवतेचा प्राणप्रतिष्ठा सोहळा; विद्यानगरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध कार्यक्रम
सेलू : नर्मदेश्वर महादेव कृपे करुन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, विद्यानगर सेलू येथे त्रिदिनात्मक प्राणप्रतिष्ठापणा व कलशारोहण सोहळ्यानिमित्त ५ ते ७ मार्च कालावधीत विविध कार्यक्रम आयोजिण्यात आले आहेत. प्राणप्रतिष्ठा पुजेचे यजमान प्रभाकर गोरे व शोभा गोरे , गणेश माळवे व छाया माळवे, प्रभाकर बारडकर व कमळ बारडकर, अमोल आकात व प्रेरणा आकात , बालाजी झमकडे व वैशाली झमकडे आहेत.
प्राणप्रतिष्ठा पूजेचे पौराहीत्य पद्माकर कुलकर्णी, मनोहर रत्नपारखी, अनिरुध्द मुळी, कृष्णा कुलकर्णी, दिनकर देवलेकर, सुनील देवलेकर गुरु यांच्या शुभहस्ते करण्यात येत आहे. भाविक भक्तांनी सहभागी होऊन सहकार्य करावे ही विनंती
८ मार्च रोजी रात्रौ ०८ ते १० श्री ह.भ.प. आनंत महाराज पावडे यांचे हरिकिर्तन होईल. ९ मार्चला सकाळी १० ते ०२ पर्यंत श्री विठ्ठल रुक्मिनी मंदिर, विद्यानगर सेलू येथे महाप्रसाद होईल. सर्वानी वरील कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा , असे आवाहन गणेश शेषराव माळवे, सौरभ गणेश माळवे, निलेश गणेश माळवे यांनी केले आहे.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष एकनाथराव थोरात, दत्तराव पावडे, आसारामजी गजमल, जनार्धन पाटील, सदाशिव जाधव, हरिभाऊ कोल्हे, रोहीदास मोगल बाबासाहेब पावडे, केशव बोराडे, प्रशांत सोळंके, प्रभाकर गोरे, मंदाकिनी पावडे, महानंदाबाई शेळके, इंदुबाई लहाने श्रीमती कमलबाई शिंदे, कमलबाई शिवाजीराव निवळकर, श्रीमती लक्ष्मीबाई माळवे, सुरेश कलालडे सर्व सदस्य व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.