केमापूरच्या शाळेत ‘महाराष्ट्राची लोकधारा’ रंगली ; बहारदार सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध
सेलू जि.परभणी : केमापूर येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीने आयोजित ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम मंगळवारी, पाच मार्च रोजी उत्साहात झाला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार सादरीकरणाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वंदना केशव गुठ्ठे होत्या. सरपंच लक्ष्मीबाई संभाजी सारोक, नवनाथ गवलवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. गोंधळ,गरबा, दांडिया,कोळी नृत्य, बंजारा गीते, शेतकरी गीते, बालगीते, गवळणी, देशभक्ती गीते सादर आदींच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. ‘मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम’ .या नाटिकेने उपस्थितांना खळखळून हसविले. विचार करायला भाग पाडले. महावाचन चळवळ या उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रेरक प्रसंगावरील नाट्यीकरणाने उपस्थितांच्या मनात उत्साह आणि जोष संचारला. प्रास्ताविक शरद ठाकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रणिता गाडे यांनी केले. दगडोबा माघाडे यांनीआभार मानले. कार्यक्रमासाठी नारायण अष्टकर, प्रभावती घुगे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमला विद्यार्थी, पालक, ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.