सेलूतील शारदा विद्यालयात शैक्षणिक साहित्याचे वाटप
प्राचार्य डॉ.ए.एम.डख यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
सेलू : येथील श्री संत गोविंद बाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ संचालक प्राचार्य डॉ.ए.एम.डख यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त वरद डायग्नोस्टीक सेंटरचे डॉ.आशिष डख यांच्या वतीने येथील शारदा विद्यालयतील १५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष मुंजाभाऊ भिसे, प्रमुख पाहुणे म्हणून प्रल्हादराव कान्हेकर, सहसचिव सुनील डख, मुख्याध्यापक डी.डी.शिंदे, बी.आर.साखरे, प्रा.पुराणिक यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी प्राचार्य डॉ.ए. एम.डख यांचा श्री संत गोविंद बाबा शिक्षण प्रसारक मंडळ व शारदा विद्यालय आणि शारदा प्राथमिक शाळेच्या वतीनेनअभिष्टचिंतन करण्यात आले. मुंजाभाऊ भिसे यांनी प्राचार्य डॉ ए.एम.डख यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात अधिष्ठाता व प्रकल्प अधिकारी म्हणून सेवा करताना शेतकरी व समाजासाठी केलेले कार्य, तसेच सेलू येथे कृषी महाविद्यालयाच्या स्थापना व जडघडणीत तसेच शारदा विद्यालयाच्या जडघडणीत प्राचार्य डॉ ए. एम. डख यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाचे व शैक्षणिक कार्याचे कौतुक केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक डी.डी.शिंदे, सूत्रसंचालन सुभाष मोहकरे, तर भरत रोडगे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी अभिमान पाईकराव, संदीप जुमडे, सीमा उंडे, उषा कामठे, आनंद देवधर, वरद डख, विजय अंभुरे, बालासाहेब टरपले, श्रीमती भारती मुळे यांनी परिश्रम घेतले.