मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा : बक्षीस वितरणप्रसंगी ‘त्या’ प्रकल्प संचालकास पोलिस ठाण्यात ठेवले बसवून…
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा राज्य सरकारने राबिवलेला अत्यंत स्तुत्य उपक्रम ठरला, परंतु निकष आणि गुणांकनावरून राज्यभरातून अनेक तक्रारी आहेत. तसेच केंद्रस्तरापासून नेमलेल्या परीक्षक समितीवरही ठिकठिकाणी आक्षेप घेतले गेले. याकडे सर्व संबंधितांकडून दुलर्क्ष झाल्याचे दिसून येते. PLC स्वच्छता मॉनिटर प्रकल्प संचालक रोहित आर्या यांनी घेतलेल्या आरोपात किती तथ्य आहे. याबाबत निश्चित सांगता येत नाही. परंतु चुकीच्या गुणांकनावरून मूल्यांकन झाल्याची ओरड सर्वत्र आहे. हे मात्र खरे.
परभणी : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा गुणांकन आणि सर्व स्तरावर विजेते निवडण्यात अनेक चुका झाल्याचे त्यातील सर्वाधिक गुणांचे महत्व असलेल्या PLC स्वच्छता मॉनिटर प्रकल्प संचालक रोहित आर्या यांने कळवले होते. सर्व अधिकाऱ्यांना याबाबत विनवण्या केल्या असून देखील, गुण जाहीर न करता ५ मार्च रोजी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये प्रवेश पास नसल्याचे कारण सांगून प्रवेश नाकारला, तर मारिन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला घेऊन गेले. दोन ते अडीच तास तेथेच बसवून ठेवल्यावर सोडताना “तुम्ही संभाव्य धोका” असल्याचे सांगितले गेले, असा आरोप PLC स्वच्छता मॉनिटरचे प्रकल्प संचालक रोहित आर्या यांनी बुधवारी, सहा मार्च रोजी केला आहे. या संदर्भात व्हाटसंअप समाजमाध्यमावर पोस्ट करून आर्या यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत.
या पोस्टमध्ये आर्या यांनी काही मुद्दे नमूद केले आहेत. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाचे चुकीचे मूल्यांकन झाल्याची माहिती, प्रकल्प संचालक रोहित आर्या यांनी गुणांकन होत असताना देखील अधिकाऱ्यांना कळविले होते. कोणत्याही अधिकाऱ्याने याची दखल घेतली नाही. प्रयत्न करून देखील मंत्री महोदयांना भेटायचा किंव्हा फोनवर बोलण्याची संधी दोन दिवस मिळाली नसल्याने आर्या यांनी शाळांना देखील झालेल्या चुका ई-मेल आणि सोशल मीडिया द्वारे मंत्री महोदयांपर्यंत पोचवण्यास सुचवले होते. इतक्या चुकीचे झाल्याचे मंत्री महोदयांना कळाले तर ऐनवेळी देखील ते योग्य निर्णय घेण्याचा विचार करतील आणि खरोखर योग्य शाळांना सन्मानित करतील असा विश्वास आर्यांना होता. चुकीच्या मूल्यांकनाबाबतच्या घेतलेल्या पाऊलामुळे असावे, त्यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण देखील दिले गेले नव्हते.
शेवटचा प्रयास, कार्यक्रमाच्या आधी मंत्री महोदयांना भेटून घडलेल्या चुकीचे प्रमाण सांगण्याच्या हेतूने तिथे गेल्यावर, सुमारे दीड तासाने मुंबई विभाग उपसंचालक संदीप सांगावे यांने त्यांना बोलावले, आणि अचानक पोलीस उपनिरीक्षक येऊन आमंत्रण ‘पास’ नसून आल्यामुळे मारिन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पुढे २ – २/३० तिथे बसवून ठेवल्यावर सोडताना “तुम्ही संभाव्य धोका” असल्याचे त्यांना सांगितले गेले. असे करून कार्यक्रमाच्या आधी मंत्री महोदयांना खूप अयोग्य गुणांकन झाल्याची माहिती सांगण्याची संधी चुकवली.
एका शिक्षकाने व्यासपीठावर पारितोषिक स्वीकारताना असे झाल्याचे कळवल्यावर मंत्री महोदयांच्या त्यांने तातडीने आर्यांना सोडण्याच्या सूचना दिल्या. परत आल्यावर कार्यक्रम पूर्ण होण्यापर्यंत थांबून आर्या मंत्री महोदयांना भेटले. या झालेल्या घटनेची साहेबांने दिलगिरी व्यक्त केली, परंतु इतके दिवस काम केलेल्या PLC स्वच्छता मॉनिटर बाबत जे चूक झाले, आणि पुढे काय या बाबत नंतर बोलू असे सांगून गेले.
“मला का आणि कोणाच्या सांगण्यावरून पोलीस घेऊन गेले हे कळत नाही. मी मूल्यांकनाचे सत्य मंत्री महोदयांना किंव्हा मुख्यमंत्री साहेबांना सांगण्याची कदाचित कोणाला तरी चिंता होती. आदल्या दिवशी साहेबांचे खासगी सचिव मंगेश शिंदे यांना मी सत्य सांगत असल्या बाबत फोन केला होता. त्यांना मी स्पष्ट सांगितले होते कि साहेबांने बजेट देऊन देखील PLC स्वच्छता मॉनिटर बरोबर केला गेला नाही. यावर मला आक्षेप आहे व चुकीच्या शाळा निवडल्या गेल्या याला मी सहमत नाही. आक्षेप घेतल्यामुळे PLC स्वच्छता मॉनिटर प्रकल्प संचालक असून आमंत्रण देखील नाही हे अपमानास्पद आहे. मला केवळ मंत्री महोदयांना कार्यक्रम आधी भेटून हे बोलायचे आहे. कारण त्यांना इतका अन्याय माझ्यावर व अनेक शाळांवर झालेला आवडणार नाही यावर माझा विश्वास आहे. परंतु कार्यक्रम खराब होईल किंवा मंत्री महोदयांना त्रास होईल असे करण्याचा माझा काही विचार नाही.”
♦या पुढे काय…
PLC स्वच्छता मॉनिटर महाराष्ट्र मधून कचऱ्याबाबत होणाऱ्या निष्काळजीपणाची सवय मोडून काढण्याचे माझे खासगी अभियान आहे. शाळा आणि विद्यार्थी सर्वात महत्वाचे असल्याने शिक्षण विभागाने सहकार्य केले. पहिल्यांदा स्वखर्चाने, आणि दुसऱ्यांदा शिक्षण विभागाच्या थोड्या योगदानाने मी राबवले. परिणामकारक सिद्ध झाल्याने शिक्षण विभागाने ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सोबतच लोकार्पण केले आणि भरघोस पारितोषिके असलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मध्ये सर्वाधिक १० गुणांचे महत्व, आणि माझ्या संकल्पनेप्रमाणे राबवण्यास बजेट देखील ठेवले. परंतु अर्धवट समजून अर्धवट केले गेले, बरोबर समजून करणाऱ्या शाळांवर गुणांकनात अन्याय केला. त्यामुळे आता PLC स्वच्छता मॉनिटर चालू राहील का नाही हे शाळांच्या सहभागावर अवलंबून आहे आणि शासन पुरस्कृत होईल का खासगी हे मंत्री महोदयांसोबत चर्चा झाल्यावर ठरेल, असे रोहित आर्या यांनी म्हटले आहे.