मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा : गुणांकन निकषावरील डॉ.संजय रोडगे यांच्या आक्षेपांकडेही झाले दुर्लक्ष
सेलू जि.परभणी : ‘मुख्यमंत्री माजी शाळा, सुंदर शाळा’ या योजनेअंतर्गत विनाअनुदानित, स्वयं अर्थ सहाय्यित शाळांच्या गुणांकन निकषाबाबत इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशने उपाध्यक्ष तथ सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रो़डगे यांनी शालेय शिक्षण मंत्रीदिपक केसरकर यांना १६ जानेवारी रोजी पत्र पाठवून आक्षेप नोंदिविला होता. त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे.डॉ. रोडगे यांनी पाठविलेल्या पत्रात असे नमूद आहे, की ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा, या योजनेअंतर्गत राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार शासकीय शाळा व अनुदानित शाळांना १०० गुणांची वर्गवारी केलेली आहे. परंतु राज्यात अनेक शाळा विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित तत्त्वावर कार्यरत आहेत. तरी त्यांना मध्यान्ह भोजन योजना लागू नाही. त्यामुळे प्रधानमंत्री पोषण योजनेसंदर्भातील एकूण ०७ गुण या शाळांना प्राप्त होणार नाहीत. सदरील शाळांचे हे ०७ गुणांचे होणारे नुकसान आपण कशा पद्धतीने गुणांचे मूल्यांकन करून सदरील शाळांना देणार आहात. याबाबत स्पष्टता करून; सर्व शाळांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यासंदर्भात आपण त्वरित योग्य निर्णय घेऊन सदरील शाळांना दिलासा द्यावा.