जागतिक महिला दिन : सेलूतील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात कार्यक्रम
सेलू जि. परभणी : येथील क्रांती फाऊंडेशन व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय यांच्या वतीने शुक्रवारी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने महिला संरक्षण कायदा व महिला आरोग्य विषयक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी फाउंडेशनच्या अध्यक्षा पोर्णिमा जोहिरे यांनी मुलीसांठी असलेल्या कायद्यांची माहिती देत मुलींनी निर्भय होण्याचे आवाहन केले. मुलींनी शिक्षणासोबतच आरोग्य बद्दल जागृत असणे आवश्यक आहे, असे असे मत डॉ.माधुरी सरकटे-कामखेडे यांनी केले. केंद्र प्रमुख एकनाथ जाधव, माजी नगरसेवक ऊर्मिला बोराडे यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापिका वेडे, शुभांगी सांगळे, शेख सीमा, सुवर्णा कांबळे, सरोज पाटोळे, मीना लोंढे, छाया पाचलेगाकर, कांचन हिवाळे, प्रियंका संघई आदींसह विद्यार्थिनींची उपस्थिती होती.