सेलूतील गटकळ अकॅडमीच्या दोघांची वनरक्षकपदी निवड; फटाक्यांच्या आतषबाजीत आनंदोत्सव 

सेलूतील गटकळ अकॅडमीच्या दोघांची वनरक्षकपदी निवड; फटाक्यांच्या आतषबाजीत आनंदोत्सव 

सेलूतील गटकळ अकॅडमीच्या दोघांची वनरक्षकपदी निवड; फटाक्यांच्या आतषबाजीत आनंदोत्सव 

सेलू जि.परभणी : छत्रपती संभाजीनगर येथील वनरक्षक या पदाचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये सेलू येथील गटकळ करिअर अकॅडेमीची विद्यार्थिनी प्रतिमा अंबादास पांचाळ ( रा.निवळी ता. पाथरी जि.परभणी ) व अमोल बालासाहेब सोनवणे (रा.वालूर ता.सेलू जि.परभणी या दोन विद्यार्थ्यांची वनरक्षकपदी निवड झाली. याबद्दल अकॅडमीतर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी संचालक रामेश्वर गटकळ, पांडुरंग कदम, प्रसाद महाराज काष्टे, अप्पू सेठ, बाळकृष्ण पौळ, सुधाकरराव रोकडे , शंकरराव लाटे, दीपक गटकळ, मैदानी प्रशिक्षक योगेश राठोड, गोपाल ताठे, अकॅडेमीचे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. हे यश कठीण परिस्थितीवर मात करून मिळवले त्यामुळे सर्वांनी प्रतिमाला व अमोल यांना भरभरून शुभेच्छा देत त्यांच्या यशाचे कौतुक केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!