…तर परभणी लोकसभा मतदारसंघात इतिहास घडेल : माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर; सेलूमध्ये महायुतीचा मेळावा उत्साहात
सेलू जि.परभणी : परभणी लोकसभेला प्रत्येक बुथवर किमान दीडशे मते वाढतील, असा संकल्प कार्यकर्त्यांनी केला पाहिजे आणि असे झाले तर परभणी लोकसभा निवडणूक निकालात इतिहास घडेल, असे मत माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी शुक्रवारी, १५ मार्च रोजी व्यक्त केले.
सेलू तालुका महायुती मेळाव्याप्रसंगी बोर्डीकर बोलत होते. या वेळी चंद्रकांत राठोड, राजेश विटेकर, डॉ.केदार खटीग, मुकेश बोराडे, विनोद बोराडे, विजय वरपूडकर, सुरेश भुमरे, डाॅ संजय रोडगे, दत्तराव महाराज सोनेकर विलास बाबर, संदिप लहाने, संजय लोया, माऊली ताठे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना बोर्डीकर म्हणाले की, महायुतीचा उमेदवार कोणताही असो आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे आणि नरेंद्र मोदी यांनी देशाचे नेतृत्व करण्यासाठी आपल्या भागातून उमेदवार निवडून दिला पाहिजे. नेत्यांच्या विचाराप्रमाणे काम करावे आणि मी लोकसभा मतदार संघाची जबाबदारी प्रमुख या नात्याने भारतीय जनता पार्टीने माझ्यावर सोपवलेली आहे.आ आपण सर्वांनी एक दिलाने काम करून महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी आपले आहे त्यासाठी सर्व बूथ प्रमुखांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या योजनेची घरोघरी जाऊन सांगावी व आपण आपले बूथ सांभाळावे प्रत्येक सामान्य माणसापर्यंत पोहचले पाहिजे.
प्रत्येक बूथवर किमान १५० मते वाढतील असा संकल्प केला पाहिजे आणि असे झाले तर परभणी लोकसभा निकालात इतिहास घडेल असे मत व्यक्त केले. महायुतीचा उमेदवार यावेळेस निवडून आलाच पाहिजे असा आपण निर्धार करूया असे माजी आमदार मोहन फड म्हणाले. राजेश विटेकर यांनी सांगितले की गेल्या दहा वर्षात ज्या खासदारांना जिंतूर मतदारसंघातून २५ हजाराचे मताधिक्य दिले त्या खासदारांनी जिंतूर तालुक्यात काय विकास केला असा सवाल उपस्थित केला. जिंतूर तालुक्यात कामाचे श्रेय घेण्यावरून दोन गटात भांडणे लावण्याचे काम या खासदारांनी केले. हाच काय दहा वर्षातला विकास तर सर्व लोकसभा मतदार संघात व जिल्ह्यात काय विकास केला असा सवाल ही उपस्थित केला. स्वतःच्या फायद्यासाठी खासदारकी हे पद वापरले आपल्या कामाचे उत्तर आहे म्हणून मतदारांना दहा वर्षाच्या काळात फक्त झुलवत ठेवले. सूत्रसंचालन अर्जुन बोरुळ यांनी केले. भाजप तालुका अध्यक्ष ॲड.दत्तराव कदम यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी शंकरराव भोंडवे, कपिल फुलारी बाळासाहेब काजळे, अशोक अंभोरे, गणेश काटकर, संदीप बोकन, विठ्ठल कोकर, अशोक ताठे, अभय महाजन, महेश नावाडे, अमोल भोसले, प्रकाश शेरे, दीपक चव्हाण पंकज वायाळ, पराग गोळेगावकर, सर्व भाजप कार्यकर्त्यांनी परिश्रम केले.