‘राष्ट्रवादी’च्या सेलू तालुकाध्यक्षपदी सुधाकर रोकडे यांची निवड
विविधस्तरांतून स्वागत

सेलू जि.परभणी : तालुक्यातील हातनूर येथील युवा कार्यकर्ते सुधाकर रोकडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदश्चंद्र पवार गट) तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. परभणी येथील महाविकास आघाडीच्या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष विजय गव्हाणे व मान्यवरांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले. पत्रात नमूद केले आहे की, आपली पक्षाच्यावतीने सेलू अध्यक्षपदी निवड करण्यात येत असून पक्षप्रमुख शरद पवार यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करून पक्षाला बळकटी देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलेले पक्षाचे कार्यक्रम व ध्येय धोरणाची अमंलबजावणी करावी. सुधाकर रोकडे हे माजी आमदार विजय भांबळे यांचे कट्टर समर्थक असून त्यांनी यापूर्वी यूवक कार्याध्यक्ष, तालुका कार्याध्यक्ष तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य या पदावर काम केले असून त्यांची तालूकाध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.