लोकशाही उत्सव : हिंगोली, नांदेड, परभणी लोकसभेसाठी २६ एप्रिलला मतदान; आचारसंहिता लागू 

लोकशाही उत्सव : हिंगोली, नांदेड, परभणी लोकसभेसाठी २६ एप्रिलला मतदान; आचारसंहिता लागू 

नवी दिल्ली : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची घोषणा आज, शनिवारी, १६ मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार आणि सुखबीरसिंग संधू यांनी लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. देशभरात एकूण ७ टप्प्यांत निवडणूक होईल. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मतदान होवून ४ जून रोजी निकाल लागेल. महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. १९ एप्रिलला पहिला टप्पा, २६ एप्रिलला दुसरा टप्पा, ७ मे रोजी तिसरा टप्पा, १३ मे रोजी चौथा टप्पा तर २० मे रोजी पाचवा आणि अखेरच्या टप्प्यात मतदान आहे.

महाराष्ट्रामध्ये मतदान कधी आणि कुठे ?️

️पहिला टप्पा – १९ एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

️दुसरा टप्पा – २६ एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा – ७ मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

️चौथा टप्पा – १३ मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा – २० मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

मतमोजणी – ४ जून

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!