देऊळगाव गात-खवणे पिंपरी रस्त्याचे भूमिपूजन; मुख्यमंत्री सडक योजनेचा पाच कोटींचा निधी 

देऊळगाव गात-खवणे पिंपरी रस्त्याचे भूमिपूजन; मुख्यमंत्री सडक योजनेचा पाच कोटींचा निधी 

 

सेलू : जिंतूर-सेलू तालुक्याच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या विशेष प्रयत्नातून देऊळगाव (गात) ते खवणे पिंपरीपर्यंत आठ किलोमीटर रस्त्या साठी “मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या”माध्यमातून रोड साठी ५ कोटी २१ लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला. या रस्ते कामाचे भूमिपूजन शनिवारी, १६ मार्च रोजी झाले. यावेळी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष दत्तराव कदम, तात्यासाहेब चव्हाण, कपिल फुलारी, नागेश ठाकूर, यादवराव खरात, ज्ञानोबा लोखंडे ,वशिष्ठ चव्हाण ,बळीराम चव्हाण, गजानन चव्हाण, समाधान घोडे, चंदू शिंदे, अशोक मुळे, प्रल्हादराव गोरे ,दत्तराव जाधव ,रोहिदास हिरवे, दत्ता आबा कदम, बाबासाहेब शेलार, लक्ष्मण अनभुले, आदिनाथ हराळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला खवणे पिंपरी, देऊळगाव (गात), राधे धामणगाव येथील भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!