श्रीशनीदेवाची प्राणप्रतिष्ठा पार्डीमध्ये उत्साहात; शेत नांगरतांना आढळून आली होती मूर्ती 

श्रीशनीदेवाची प्राणप्रतिष्ठा पार्डीमध्ये उत्साहात; शेत नांगरतांना आढळून आली होती मूर्ती 

श्रीशनीदेवाची प्राणप्रतिष्ठा पार्डीमध्ये उत्साहात; शेत नांगरतांना आढळून आली होती मूर्ती 

सेलू जि.परभणी : तालुक्यातील पार्डी शिवारात शेत नांगरताना आढळून आलेल्या श्री शनीदेवाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. 

पार्डी येथील आडे कुटूंबीय व ग्रामस्थांच्या वतीने हा सोहळा आयोजिण्यात आला होता. पार्डी येथील रवी धरमू आडे हे शेत नांगरत असतांना अचानकच एक दगडी शिळा नांगराने बाहेर आली. लगेच त्यांनी हा प्रकार वडील धरमू आडे व भाऊ विकास आडे यांना सांगितला. शिळेवरील माती पूर्णपणे पाण्याने धुऊन स्वच्छ केली असता त्या शिळेवर सूर्य व चंद्रकोर दिसून आली. त्यावरून मूर्ती श्री शनीदेवाची असल्याचे स्पष्ट झाले. विलासगुरू जोशी, मनीष जोशी, गौरव जोशी, गिरीश जोशी व गजानन मुळे यांच्या पौराहित्याखाली विधीवत पूजाअर्चा करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. धार्मिक प्रकारचा प्रघात असल्याने ही मूर्ती मामा-भांजे यांनी बैलगाडीतून आडे तांडा येथे प्राणप्रतिष्ठाच्या ठिकाणी आणून मूर्तीची विधिवत व मंत्रघोषात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!