बिहाणी नूतन प्राथमिक शाळेत बाल आरोग्य मेळावा उत्साहात
सेलू जि.परभणी : येथील सौ. सावित्रीबाई बद्रिनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळा व शुभंकरोती फाउंडेशनच्या वतीने मंगळवारी आयोजित बाल आरोग्य मेळावा उत्साहात पार पडला. उद्घाटनप्रसंगी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य दत्तराव पावडे, फाऊंडेशनचे किरण चौधरी, मुख्याध्यापक सुखानंद बेंडसुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. अनिल रत्नपारखी यांनी विचार मांडले. अध्यक्षीय समारोपप्रसंगी दत्तराव पावडे यांनी आरोग्य व स्वच्छतेच्या चांगल्या सवयींचे महत्त्व सांगितले. सूत्रसंचालन व आभार सोनाली कुबरे यांनी मानले. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी शुभंकरोती फाउंडेशनचे प्रतिनिधी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.