‘धुळधाण’ कांदबरीचा परभणीत प्रकाशन सोहळा; मान्यवरांची उपस्थिती
परभणी : तालुक्यातील ताडपांगरी येथील जिल्हा परिषद प्रशालेतील शिक्षक गंगाधर गायकवाड लिखित’धूळधाण ‘ या कादंबरीचा प्रकाशन सोहळा बी. रघुनाथ महाविद्यालयाच्या सभागृहात बुधवारी ( २० ) मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव हे असतील. ‘धुळधाण’ या कादंबरीचे प्रकाशन ज्येष्ठ कादंबरीकार प्रा. शेषराव मोहिते यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक डॉ. आसाराम लोमटे यांची उपस्थिती राहणार आहे. प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन मराठवाडा साहित्य परिषद शाखा परभणी आणि अक्षर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.