विविध क्षेत्रातील नागरिकांचा गौरव; सेलूतील श्री गजानन महाराज मंदिरात कार्यक्रम
सेलू जि.परभणी : सेलू येथील विवेकानंद नगरमधील श्री गजानन महाराज मंदिर संस्थानच्या वतीने विविध क्षेत्रातील नागरिकांचा नुकताच गौरव करण्यात आला. मंदिर परिसरातील विकास कामे, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करणारे तसेच स्वच्छ्ता कार्यामध्ये योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, साईराज बोराडे, सचिन कोरडे, मनीष कदम, संभाजी पवार, सतीश बलदवा, डॉ.सुबोध माकोडे आदींसह विविध क्षेत्रातील नागरिकांचा सत्कार करण्यात आला. संस्थानचे अध्यक्ष शिवाजीराव आघाव, रमेश अग्रवाल, डॉ.संजय देऊळगावकर, नंदकुमार बंगाळे, चंद्रकांत रत्नपारखी, विश्वास धर्माधिकारी, सतीश बागले, सुभाष सुरवसे, सुरेश कुंडीकर, विजय राठोड, उषा कुंडीकर, शिवाजी शिंदे, सौ.सूर्यवंशी, सौ.चव्हाण, गजानन शिंदे, श्री.ताठे आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.