श्रीकालिकादेवीचा कलशारोहण सोहळा उत्साहात; बोबडे टाकळीमध्ये विविध कार्यक्रम 

श्रीकालिकादेवीचा कलशारोहण सोहळा उत्साहात; बोबडे टाकळीमध्ये विविध कार्यक्रम 

उत्सवातील विविध कार्यक्रमाला भाविकांची मोठी उपस्थिती

परभणी : टाकळी (बोबडे) येथील श्री कालिका देवी संस्थानच्या वतीने आयोजित भव्य कलशारोहण सोहळा उत्साहात पार पडला. गुरुवारी, २१ मार्च रोजी उत्सवाची सांगता झाली. श्रीकालिकादेवीचा कलशारोहण सोहळा उत्साहात; बोबडे टाकळीमध्ये विविध कार्यक्रम 

यानिमित्ताने हभप माणिक महाराज मांगुळकर दहेगावकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. याप्रसंगी केशव महाराज टाकळीकर, अखिल भारतीय सोमवंशी क्षत्रिय कासार समाज मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष शरदराव भांडेकर, अण्णासाहेब बोबडे, इंजिनीअर प्रल्हाद होगे, देवीसाठी जागा दान देणारे बन्सीधर बोबडे पाटील तसेच दौलतराव बोबडे, रमेश बोबडे, प्रल्हाद बोबडे, प्रभाकर बोबडे, नरहरी बोबडे, कुंभारी संस्थानचे अध्यक्ष विलासराव वानरे गुरुजी, सेलू संस्थानचे अध्यक्ष अशोकराव कासार, वसंतराव कानडे, सतीशराव तळणीकर, शिवाजी मुरकुंदे, गोपाळराव सासवडे, वसंतराव विश्वंभर, गरगडे गुरुजी सुधाकर आंदोले, बबनराव कुंभकर्ण, शेषराव बोबडे पुजारी प्रवीण कुंभकर्ण, किरण कुंभकर्ण आदींसह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

कलशारोहण सोहळ्यानिमित्त १८ मार्चपासून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये केशव महाराज टाकळीकर, भागवताचार्य अभय महाराज कुंभकर्ण (केज), माऊली महाराज भसारे, झरी यांचे हरिकीर्तन झाले. भागवताचार्य अभय महाराज कुंभकर्ण यांनी प्रवचन देवीमाहत्म्य सांगितले. संतोष बन्सीधरराव बोबडे यांच्या हस्ते अभिषेक पूजा, दिपक गणेशराव फावडे वक्षअमोल प्रकाशराव फावडे यांच्या हस्ते होमहवन झाले. कलश पूजन दिपकराव फावडे यांच्या हस्ते झाले. विष्णुसहस्त्रनाम, हरिपाठामध्ये भजनी मंडळ, टाकळी (बोबडे) यांनी सहभाग घेतला. कुंकुमार्चन, कुमारीका पूजनानंतर कलश मिरवणूक काढण्यात आली. महाप्रसादाने सांगता झाली.अध्यक्ष दिपकराव फावडे, कार्याध्यक्ष वसंतराव विश्वांभरे, उपाध्यक्ष मारोती भुजबळ कोषाध्यक्ष सुभाषराव भुजबळ, सचिव राजाभाऊ भुजबळ, प्रकाशराव फावडे, सहसचिव प्रसादराव साळवे, सदस्य रावण बापुराव वानरे, नारायण फावडे, अशोकराव फावडे, रमेशराव फावडे, अनिल भुजबळ, सुरेश भुजबळ, अंकुश फावडे, गोपाळ भुजबळ, निर्मलाबाई भुजबळ, शोभाबाई भुजबळ, मंगलबाई फावडे, सल्लागार ॲड.श्रीहरी भुजबळ, बबनराव हेलसकर, बालासाहेब गरगडे, सुधाकर फावडे, विनोद फावडे, विलासराव वानरे व्यवस्थापक ज्ञानेश्वर फावडे, पुजारी प्रविणकुमार कुंभकर्ण, शिवाजी शिनगारे, कासार समाज बांधव व टाकळी (बोबडे) येथील गावकरी मंडळींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाला महिला, कासार समाज बांधव, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


वृत्तसंकलन : बाबासाहेब हेलसकर, सेलू जि.परभणी


 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!