परभणी लोकसभा : महायुतीकडून रासपचे महादेव जानकर; सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार

परभणी लोकसभा : महायुतीकडून रासपचे महादेव जानकर; सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार उपस्थित राहणार

परभणी : भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व घटक पक्षांचा समावेश असलेल्या महायुतीच्या वतीने परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांमध्ये मोठी रस्सीखेच सुरू होती. या स्पर्धेत अखेर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून जानकरांना परभणीची जागा सोडण्यात आली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शनिवारी मुंबईतील एका पत्रकार परिषदेतून माहिती दिली. जानकर सोमवारी, १ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्या व बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे उपस्थित राहणार असल्याची माहिती खुद्द जानकर यांनीच दिली. दरम्यान, जानकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याच्या निर्णयाचे परभणीतील रासपच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शनिवारी फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, महासचिव सुशील कुमार, ज्ञानेश्‍वर सलगर, सचिन देशमुख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!