परभणी लोकसभा : सेलू,परभणीतून दोघांचे अपक्ष उमेदवारी अर्ज
परभणी : परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-२०२४ करीता शनिवारी, ३० मार्च रोजी दोन अपक्ष उमेदवारांनी प्रत्येकी एक नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत. अनिल माणिकराव मुदगलकर (परभणी) आणि कृष्णा त्रिंबकराव पवार (झोडगाव ता.सेलू) यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केला आहे. १७-परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता मतदार संघातून आज एकूण २२ जणांना ३२ नामनिर्देशन पत्राचे वितरण करण्यात आले. सार्वजनीक सुट्यांचे दिवस वगळता नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटचा दिनांक गुरुवार, ०४ एप्रिल, २०२४ असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने कळविले आहे.