व्यवस्थापक संजय मगर यांचा सेवागौरव; सेलूतील पीडीसीसी बँकेमध्ये बजावली ३३ वर्ष सेवा
सेलू जि.परभणी : सेलू येथील परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शहर शाखेचे व्यवस्थापक संजय गणपतराव मगर ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. यानिमित्ताने रविवारी नूतन विद्यालयाच्या वतीने त्यांचा सेवागौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रभारी मुख्याध्यापक संतोष पाटील, नारायण सोळंके, डी.डी.सोन्नेकर, गणेश माळवे, परशुराम कपाटे, किशोर कटारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
संजय मगर यांनी १९९० साली परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेत सेवेला प्रारंभ केला. वालूर, गगुळी धामणगाव शाखेत त्यांनी सेवा बजावली. संजय मगर हे सेलू शहरात १९९४ पासून ते कार्यरत होते. दिलखुलास, मनमोकळा स्वभाव व सौजन्यपूर्ण, तत्पर सेवा यामुळे बॅंक खातेदार व सर्वच शाळांतील शिक्षकांशी मगर यांनी मैत्रीपूर्ण नाते दृढ केलेले आहे. मगर यांच्या भावी वाटचालीसाठी या वेळी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी प्रशांत नाईक, वीरेंद्र धापसे, सुनील तोडकर, राजेंद्र सोनवणे, अनंतकुमार विश्वंभर, कृष्णा रोडगे, प्रसाद कायंदे, केशव डहाळे यांची उपस्थिती होती.