चित्रकला ग्रेड परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळाउत्साहात; डासाळा येथील जिल्हा परिषदेत कार्यक्रम

चित्रकला ग्रेड परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळाउत्साहात; डासाळा येथील जिल्हा परिषदेत कार्यक्रम

एचएआरसी संस्थेचा उपक्रम

परभणी : येथील होमिओपॅथीक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेच्यावतीने बालकांचे मोबाईल व्यसन दूर व्हावे व बालकांमध्ये वाचन संस्कृती रुजावी आणि बालकांचा कला विकास मनोरंजक पद्धतीने व्हावा.या उद्देशाने तीन एप्रिलरोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सारिका गजमल, मुख्याध्यापक मधुकर काष्टे , शिक्षक सदाशिव मुळी, कार्यशाळा संयोजक पांडुरंग पाटणकर उपस्थित होते. कार्यशाळेत पाटणकर यांनी सकाळसत्रात ग्रेड परीक्षा विषय, वस्तूचित्र, स्मरणचित्र,संकल्पचित्र व नक्षीकाम आणि अक्षरलेखन आदी विषयी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. कागदकाम, ललित कला विषयी माहिती , टाळ्यांचे प्रकार विविध माध्यम प्रिंट,कोलाज चित्र आणि सुतळी काम याविषयी मार्गदर्शन केले.

द्वितीय सत्रात शेकोटी कार्यक्रमावेळी बालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. तल्लीन होऊन शाळेतील मुलांनी कृतीशील सहभाग नोंदविला. सूत्रसंचालन कीर्ती आंबेकर यांनी केले.आभार सय्यद करीम यांनी मानले. कार्यशाळेसाठी सचिन गायकवाड, गणेश कांबळे, पुष्पा नवल,  शीतल बोरसे, दीपा रयबोले, ज्योती भागवत तसेच एचएआरसी संस्थेचे डॉ.पवन चांडक आणि प्राध्यापक शिवा आयथॉल यांचे सहकार्य लाभले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!