परभणी लोकसभा : छाननीमध्ये ४२ पैकी एका उमेदवाराचा अर्ज अवैध : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे 

परभणी लोकसभा : छाननीमध्ये ४२ पैकी एका उमेदवाराचा अर्ज अवैध : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे 

छाननी प्रक्रिया पूर्ण, ८ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार

परभणी : १७-परभणी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण ४२ उमेदवारांनी ६५ नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी, ५ एप्रिलरोजी छाननी प्रक्रियेत एका उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी ही माहिती दिली. निवडणूक आयोगाचे निरीक्षक कृष्णकुमार निराला यांच्या उपस्थितीत छाननी प्रक्रिया पार पडली. यामध्ये नारायण तुकाराम चव्हाण (अपक्ष) यांचा नामनिर्देशन अर्ज अवैध ठरला. या वेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दत्तु शेवाळे यांची उपस्थिती होती. सोमवार, ८ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. शुक्रवारी, २६ एप्रिलरोजी मतदान होणार आहे. निकाल ४ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

नामनिर्देशन अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे अशी : अनिल माणिकराव मुदगलकर (अपक्ष), कृष्णा त्र्यंबकराव पवार (न्यू राष्ट्रीय समाज पक्ष), गोविंद रामराव देशमुख (अपक्ष), जानकर महादेव जगन्नाथ (राष्ट्रीय समाज पक्ष), आप्पासाहेब ओंकार कदम (अपक्ष), बोबडे सखाराम ग्यानबा(अपक्ष), जाधव संजय (बंडू) हरिभाऊ ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), मुस्तफा मैनोदिन शेख (अपक्ष), राजन रामचंद्र क्षीरसागर (भारतीय कम्युनिस्ट पार्टी), विजय अण्णासाहेब ठोंबरे (अपक्ष), विष्णुदास शिवाजी भोसले (अपक्ष), विनोद छगनराव अंभोरे (बहुजन मुक्ती पार्टी), किशोर राधाकिशन ढगे (स्वाभिमानी पक्ष), गणपत देवराव भिसे (अपक्ष), शेख सलीम शेख इब्राहिम (ऑल इंडिया मजलिस-ए-इन्कलाब-ए-मिल्लत), संगीता व्यकंटराव गिरी (स्वराज्य शक्ती सेना), विठ्ठल भुजंगराव तळेकर (अपक्ष), कांबळे शिवाजी देवजी (अपक्ष), कौसडीकर निहाल अहमद (ऑल इंडिया मजलिस-ए-इन्कलाब-ए-मिल्लत), समीरराव गणेशराव दुधगावकर (अपक्ष), अर्जुन ज्ञानोबा भिसे (अपक्ष), ॲड.डॉ.यशवंत रामभाऊ कसबे (भारतीय जनविकास आघाडी), राजेंद्र अटकळ (अपक्ष), सय्यद इर्शाद अली (सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया), जयश्री उद्धवराव जाधव ( बहुजन समाज पार्टी (आंबेडकर), राजाभाऊ शेषराव काकडे (अपक्ष), ज्ञानेश्वर जगन्नाथ दहिभाते (अपक्ष), कैलास बळीराम पवार (बळीराजा पार्टी), बाबासाहेब भुजंगराव उगले (वंचित बहुजन आघाडी), सुभाष दत्तराव जावळे (अपक्ष), किशोरकुमार प्रकाश शिंदे (अपक्ष), आलमगीर मुहम्मद खान (बहुजन समाज पार्टी), डॉ.गोवर्धन भिवाजी खंडागळे (बहुजन भारत पार्टी), पंजाब उत्तमराव डख (वंचित बहुजन आघाडी), हरिभाऊ चांदोजी शेळके (ओबीसी बहुजन पक्ष), कारभारी कुंडलिक मीठे (अपक्ष), श्रीराम बन्सीलाल जाधव (जय सेवालाल बहुजन विकास पार्टी), सय्यद अब्दुल सत्तार (आंबेडकर समाज पार्टी), अर्चना दिनकर गायकवाड (अपक्ष), दशरथ प्रभाकर राठोड (महाराष्ट्र विकास आघाडी), विलास तांगडे (अपक्ष)

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!