श्रीकालिंकादेवीची यात्रा बुधवारपासून; हेलसमध्ये कीर्तन, प्रवचनासह विविध कार्यक्रम
सेलू जि.परभणी : सेलू शहरापासून जवळच असलेल्या हेलस (ता.मंठा) येथील श्री कालिंकादेवीच्या ४१ व्या यात्रा महोत्सवाला, बुधवारी, १० एप्रिलपासून सुरुवात होत आहे. या निमित्ताने तीन दिवस पारंपरिक धार्मिक उत्सव; तसेच कीर्तन, प्रवचन, आराधना, सामाजिक, सांस्कृतिक आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थानचे अध्यक्ष सतीश तळणीकर यांनी ही माहिती दिली. या वेळी उपाध्यक्ष सुभाष दहिभाते, सचिव बाबासाहेब हेलसकर, बालासाहेब दहिभाते, बबनराव हेलसकर, गोपाळराव दहिभाते, माधव वानरे, गोपाळ नामदेव, गजानन कुंभकर्ण, वर्धमान कासार, अशोक हेलसकर यांची उपस्थिती होती. उत्सवानिमित्त दररोज सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेत महावीर आहेर (भोगाव देवी) व राजेश रवणे (अकोला) यांच्या नेतृत्वात देवीला पारंपरिक चढाव, अभिषेक, महापूजा, आरती होईल. सायंकाळी सहा वाजता रामप्रसाद रोडगे यांच्या नेतृत्वाखाली रवळगाव (ता.सेलू) येथील जगदंबा भजनी मंडळांच्या वतीने संगीत हरिपाठ होणार आहे. सात वाजता देवीचा छबिना उत्सव, आरती आहे. गुरुवारी (११ एप्रिल) दुपारी माणिक महाराज मांगुळकर यांचे, तर शुक्रवारी (१२ एप्रिल) दुपारी रामेश्वर महाराज नालेगावकर यांचे काल्याचे कीर्तन आहे. दररोज दुपारी चार वाजता महापूजा यजमानातर्फे आराधना महाप्रसाद आहे. छगनराव हेलसकर, शंकरराव हेलसकर, रमेश हेलसकर, वर्धमान कासार, नारायण कुंभकर्ण, गजानन कुंभकर्ण, भरत दहिभाते, गजानन हेलसकर, पंढरीनाथ हेलसकर, ज्ञानेश्वर हेलसकर, विजय दहिभाते, सूरज दहिभाते, गजानन ढोले, प्रमोद दहिभाते, कालिदास दहिभाते, कृष्णा दहिभाते, संदीप दहिभाते, संतोष दहिभाते, सुनील कुंभकर्ण, नवनाथ कुंभकर्ण आदींसह श्री गणेश भजनी मंडळ, हरहर महादेव वारकरी शिक्षण संस्था भजनी मंडळ श्री कालिका महिला मंडळ, श्री कालिका नवयुवक मंडळ परिश्रम घेत आहे.