सेलूतील डॉ.दिगंबर घोडके आदर्श धन्वंतरी पुरस्काराने सन्मानित
कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
सेलू जि.परभणी : सेलू येथील श्री रेणुका क्लिनिकचे संचालक डॉ.दिगंबर तुळशीराम घोडके यांना राज्यस्तरीय आदर्श धन्वंतरी पुरस्काराने रविवारी, सात एप्रिल रोजी कोल्हापूर येथे गौरविण्यात आले. एम.के.फाउंडेशन व विशाल क्रांती न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजिण्यात आला होता. ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ या उद्दात धेय्याने डॉ.घोडके यांचे सेलू शहर व परिसरातील वैद्यकीय क्षेत्रात अतुलनीय योगदान आहे. सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य व रुग्णसेवेचे व्रत डॉ.घोडके यांच्या कार्यातून दिसून येते. विविध आरोग्य विषयक शिबिरे, मेळावा आणि सर्वसामान्य गोरगरीब, वंचितांना परवेडल अशा पद्धतीने वैद्यकीय उपचार सेवा देणारे डॉक्टर म्हणून घोडके सेलू शहराच्या पंचक्रोशीत ओळखले जातात. पुरस्काराबद्दल डॉ.घोडके यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.