डॉ.अभिषेक खराडे यांना पत्रकार भूषण पुरस्कार
सेलू जि.परभणी : येथील पत्रकार डॉ.अभिषेक रमेशराव खराडे पाटील यांना एम.के. फाउंडेशन दिल्ली व दैनिक विशाल क्रांती यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श पत्रकार भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. रविवारी, सात एप्रिल रोजी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ.खराडे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. अनेकांना न्याय देण्याचे काम केलेले आहे. याची दखल घेऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या बद्दल डॉ.खराडे यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.