परभणी लोकसभा : ३४ उमेदवार रिंगणात; सात जणांची माघार
परभणी : १७-परभणी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्ष,अपक्षांसह एकूण ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. छाननी प्रक्रियेनंतर मतदारसंघात एकूण ४१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या सोमवारी, ८ एप्रिल रोजी सात जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी ही माहिती दिली.
बाबासाहेब उगले, हरिभाऊ शेळके, कौसडीकर निहाल अहेमद, अर्चना गायकवाड, विठ्ठल तळेकर, जयश्री जाधव, डॉ.यशवंत कसबे यांनी सोमवारी उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे एकूण ३४ उमेदवार रिंगणात आहेत.
निवडणूक लढविणारे उमेदवार व चिन्ह : आलमगीर मोहम्मद खान (बहुजन समाज पार्टी-हत्ती ), जाधव संजय (बंडु) हरिभाऊ (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे-मशाल), कैलास बळीराम पवार (बळीराजा पार्टी- ऊस शेतकरी), डॉ.गोवर्धन भिवाजी खंडागळे (बहुजन भारत पार्टी-बॅटरी टॉर्च), जानकर महादेव जगन्नाथ (राष्ट्रीय समाज पक्ष-शिट्टी ), दशरथ प्रभाकर राठोड (महाराष्ट्र विकास आघाडी-गॅस सिलेंडर), पंजाब उत्तमराव डख (वंचित बहुजन आघाडी-रोड रोलर), राजन रामचंद्र क्षीरसागर (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया-ओंबी आणि विळा ), विनोद छगनराव अंभुरे (बहुजन मुक्ती पार्टी- खाट), शेख सलिम शेख इब्राहिम (ऑल इंडिया मजलिस-ए-इन्कीलाब-ए-मिल्लत-जहाज), सयद इरशाद अली (सोशल डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया-ऑटो रिक्षा), संगीता व्यंकटराव गिरी (स्वराज्य शक्ती सेना-हिरा ), श्रीराम बन्सीलाल जाधव (जय सेवालाल बहुजन विकास पार्टी-दूरदर्शन ), तर अपक्ष उमेदवार व त्यांचे चिन्हे अशी : अनिल माणिकराव मुदगलकर-हॉकी आणि बॉल, अर्जुन ज्ञानोबा भिसे-शिवण यंत्र, आप्पासाहेब ओंकार कदम-बादली, कांबळे शिवाजी देवजी- कॅमेरा, कारभारी कुंडलिक मिठे-कढई, किशोर राधाकिशन ढगे-बॅट, किशोरकुमार प्रकाश शिंदे-संगणक, कृष्णा त्रिंबकराव पवार-तुतारी, गणपत देवराव भिसे-बूट, गोविंद रामराव देशमुख-फलंदाज, बोबडे सखाराम ग्यानबा-कात्री, मुस्तफा मैनोदिन शेख-कॅरम बोर्ड, राजाभाऊ शेषराव काकडे-ईस्त्री, राजेंद्र अटकळ-किटली, विजय अण्णासाहेब ठोंबरे- एअर कंडिशनर, विलास तांगडे-चिमणी, विष्णुदास शिवाजी भोसले-नागरिक, समीरराव गणेशराव दुधगावकर-प्रेशर कुकर, सय्यद अब्दुल सत्तार-अंगठी, सुभाष दत्तराव जावळे-ट्रक, ज्ञानेश्वर जगन्नाथ दहिभाते-कपाट