Saibaba Bank : हेमंतराव आडळकर ‘सर्वोत्कृष्ट चेअरमन’ पुरस्काराने सन्मानित
नवी दिल्ली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान
सेलू जि.परभणी : सेलू येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर यांना राष्ट्रीयस्तरावरील अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘बेस्ट चेअरमन परफॉर्मन्स अवॉर्ड फॉर को-ऑपरेटिव्ह बँक डेव्हलपमेंट विथ मेडल’ पुरस्काराने सोमवारी, ८ एप्रिल रोजी नवी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. दिल्ली येथील ऑल इंडिया बिझनेस डेव्हलपमेंट ऑफ इंडिया, ग्लोबल सोसायटी फॉर हेल्थ अँड एज्युकेशन ग्रोथ प्रमोटिंग अचिव्हमेंट्स फाउंडेशनच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष चंद्रशेखकर मुळावेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाणे, दतराव आंधळे, शशिकांत कुलकर्णी, विलास पौळ आदींची उपस्थिती होती. आडळकर यांच्या नेतृत्वाखाली साईबाबा बँकेने सात शाखांद्वारे ग्राहकांना सेवा, उत्कृष्ट प्रशासन देत सामाजिक बाधिलकी जपली आहे. सेलू नगरपरिषदचे अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँकचे संचालक आदींसह विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांद्वारे आडळकर यांचे मोठे योगदान राहिले आहे. याची दखल घेऊन पुरस्काराने गौरविण्यात आले. याबद्दल आडळकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.