रमजान ईदनिमित्त शुभेच्छांचा वर्षाव; सेलूमध्ये विविध पक्ष, सामाजिक संस्थातर्फे कार्यक्रम
परभणी : मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईदनिमित्ताने सेलू येथील विविध स्तरातील नागरिकांनी मुस्लिम समाज बांधवांवर गुरुवारी , ११ एप्रिल रोजी शुभेच्छांचा वर्षाव केला. सकाळी विशेष नमाज अदा करण्यासाठी ईदगाहमध्ये मुस्लिम बांधवांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी मौलाना तज्जुमल कास्मी यांनी, तर मदिना मस्जिदमध्ये मौलाना खाजा यांनी नमाज पठण केले. नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यानिमित्ताने सद्भावना मित्र मंडळ व नगरपालिकेच्या वतीने शुभेच्छा कार्यक्रम झाला. प्रारंभी कै.शंकरराव मंडलिक यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, मुकेश बोराडे, देविदास जाधव, प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, अजित मंडलिक, साईराज बोराडे, काशीनाथ पल्लेवाड, संतोष पाटील, के.के.देशपांडे आदींची उपस्थिती होती. महाविकास आघाडीच्या वतीने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. साईबाबा नागरी बँकचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, माजी जिप सदस्य अशोक काकडे, सुधाकर रोकडे नामदेव अप्पा डख रघुनाथ बागल, मनिष कदम, संभाजी पवार, विठ्ठल काळबांडे, बाळू जोगदंड, विनोद तरटे, बाळासाहेब रोडगे, योगेश कुलकर्णी, आनंद डोईफोडे, वैभव वैद्य, गोटू धापसे, अरुण ताठे आदींची उपस्थिती होती.