Loksabha Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परभणीमध्ये २० एप्रिलरोजी सभा
परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २० एप्रिलरोजी परभणीत जाहीर सभा होणार आहे. आमदार मेघना बोर्डीकर साकोरे यांनी ही माहिती दिली आहे.
आमदार बोर्डीकर यांनी शनिवारी (१३ एप्रिल) आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटद्वारे त्या संदर्भातील माहिती दिली आहे. मागील आठवडाभरापासून पंतप्रधान मोदी यांच्या परभणीतील प्रचारसभेसंदर्भात सोशल मीडियावर चर्चा सुरु होती. परंतु,महायुतीतील उमेदवारासह अन्य नेतेमंडळींनी त्या संभाव्य सभेच्या चर्चेस दुजोरा दिला नव्हता. आता ही सभा निश्चित झाली आहे.