साईबाबा बँकेला ४ कोटी ३७ लाखांचा नफा : हेमंतराव आडळकर; दहा टक्के दराने लाभांश वाटप
सेलू जि.परभणी : गेल्या दहा वर्षापासून विविध पुरस्कारांनी सन्मानित सेलू येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेला मार्च २०२४ अखेर सर्व कर व तरतुदी वजा जाता १ कोटी ९० लाख रूपयाचा नफा झाला आहे. तर सकल ढोबळ नफा ४ कोटी ३७ लाख रुपये आहे. सभासदांना दहा टक्के दराने लाभांश वाटप करण्यात येत आहे. बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी ही माहिती दिली. आर्थिक वर्षात बँकेकडे भाग भांडवल ६ कोटी २ लाख रूपये, स्वनिधी १५ कोटी ८३ लाख रुपये, ठेवी २१० कोटी ६८ लाख रुपये, कर्ज वाटप १२० कोटी रुपये आहे. बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के असून ग्रॉस एनपीए ६.२८ टक्के आहे. एकूण सभासद ८८९६ आहेत. सर्व शाखा नफ्यात आहेत. दहा वर्षापासून सभासदा़ना १० टक्के वाटप केला जात आहे. नेट एनपीए शून्य टक्के राहील या दृष्टीने नियोजन असल्याचे आडळकर यांनी सांगितले. ग्राहकांनी जास्ती जास्त डिजिटल पेमेंट सुविधेचा वापर करावा, असे आवाहन केले आहे. प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाणे यांनी केले. बँकेच्या सर्व स्तरावरील प्रगतीमध्ये सभासद, संचालक मंडळ, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, कर्मचारी यांचे अमूल्य सहकार्य आहे, असे लाडाणे म्हणाले. या वेळी उपाध्यक्ष चंद्रशेखर, मुळावेकर व्यवस्थापक निसार पठाण, सभासदा़ची उपस्थिती होती.