श्रीराम जन्मोत्सव : देखाव्यांनी वेधले सेलूकरांचे लक्ष; मिरवणूक उत्साहात
सेलू जि.परभणी : श्रीराम जन्मोत्सव समिती व तुम्ही आम्ही सेलूकरांच्या वतीने बुधवारी, १७ एप्रिल रोजी भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण दिल्ली येथील महाकाल अघोरी नृत्य पथक, उज्जैन येथील झांज पथक ठरले. शोभायात्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार, प्रभू श्रीरामांचा सजीव दरबार, मुलींचे लेझीम पथक, प्रभू श्रीरामाच्या गीतावर मुलींचे सांस्कृतिक नृत्य, श्री विठ्ठल रुक्मिणी वारकरी भजनी मंडळ आदींनी सहभाग घेतला. जेसीबीने मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. नागरिक, महिला मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.