श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सेलूमध्ये मिरवणूक, महाआरती
सेलू जि.परभणी : सेलू शहरासह जिल्हाभरात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ठिकठिकाणी कीर्तन, जन्मोत्सव सोहळा, मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले. सेलू येथील श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने संत श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरात शास्त्रोक्त पद्धतीने १०१ दांपत्याच्या हस्ते श्रीराम महायज्ञ उत्साहात पार पडला. प्रभु श्रीरामांच्या अभिषेकानंतर दुपार बारा वाजता प्रभु श्रीराम जन्मोत्सव महायज्ञाला सुरुवात झाली. प्रसादाने सांगता झाली. सकाळी प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी माजी आमदार विजय भांबळे, अशोक काकडे, सुधाकर रोकडे, रघुनाथ बागल, शिवराम कदम, विशाल देशमुख, सचिन शिंदे, कैलासराव मोगल, जीवन आवटे, योगेश कुलकर्णी, उदय रोडगे, बालाप्रसाद राठोड, प्रभाकर सोळंके, विष्णू बागल, सुनील गायकवाड तसेच सेलू शहरातील सर्व नागरिकांची उपस्थिती होती. श्रीसाईबाबा मंदिरात आयोजित श्री साई महोत्सवाचा समारोप झाला. शिवाजी महाराज खवणे यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर श्रीराम जन्मोत्सव सोहळा झाला. दुपारी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी महाआरतीला भाविकांनी मोठी गर्दी केली होती.