श्रीराम जन्मोत्सव : सेलूमध्ये सामुहिक श्रीराम महायज्ञ उत्साहात; १०१ दाम्पत्यांचा सहभाग

श्रीराम जन्मोत्सव : सेलूमध्ये सामुहिक श्रीराम महायज्ञ उत्साहात; १०१ दाम्पत्यांचा सहभाग

सेलू : येथील श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने बुधवार १७ एप्रिल रोजी श्रीराम नवमीनिमित्त संत श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरात शास्त्रोक्त पद्धतीने १०१ दांपत्याच्या हस्ते श्रीराम महायज्ञ उत्साहात पार पडला. ५०० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रभु श्रीराम अयोध्येत परतल्यानंतरची ही पहिलीच रामनवमी आहे. यानिमित्ताने सेलूतील विविध जातीपंथातील १०१ दाम्पत्यांना या महायज्ञासाठी आमंत्रित करण्यात आले होते. कोरोनाकाळात देखील गरीब गरजूंना मदत करून मागील ८ वर्षांपासून अखंडित कार्य करणाऱ्या श्रीराम जन्मोत्सव समिती, सेलू मार्फत या सामुहीक यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम प्रभु श्रीरामाचा अभिषेक करण्यात आला. दुपारी १२ वाजता प्रभु श्रीराम जन्मोत्सव महायज्ञाला सुरुवात करण्यात आली. प्रसादाने सांगता झाली.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!