परभणी लोकसभा : खासदार जाधवांच्या प्रचारार्थ सेलूमध्ये पदयात्रा

परभणी लोकसभा : खासदार जाधवांच्या प्रचारार्थ सेलूमध्ये पदयात्रा

जनता जनार्दन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे विजयाची आपल्याला कसलीही काळजी नाही. प्रत्यक्ष ‘विजयच’ आपल्या सोबत उभा आहे. त्यामुळे विजय आपलाच आहे, असे खासदार संजय जाधव यांनी यावेळी नमूद केले.

परभणी लोकसभा : महाविकास आघाडीच्या पदयात्रेला सेलूमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

सेलू जि.परभणी : महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी, १९ एप्रिलरोजी सेलू शहरातून काढण्यात आलेल्या पदयात्रेला ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरापासून पदयात्रेला सुरुवात झाली. आठवडी बाजार येथे सय्यद शहाबुद्दीन अवलिया यांच्या समाधीवर चादर चढविण्यात आली. यानिमित्ताने माजी आमदार विजयराव भांबळे म्हणाले, की आपले कार्य हीच आपल्या लोकप्रियतेची पावती असते. खासदार संजय जाधव  हे कर्तृत्ववान आणि निष्ठावान खासदार आहेत. येत्या २६ तारखेला ‘मशाल’ या चिन्हासमोरील बटन दाबून जाधव यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन भांबळे यांनी केले. जनता जनार्दन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे विजयाची आपल्याला कसलीही काळजी नाही. प्रत्यक्ष ‘विजयच’ आपल्या सोबत उभा आहे. त्यामुळे विजय आपलाच आहे, असे खासदार संजय जाधव यांनी यावेळी नमूद केले. विजयराव भांबळे यांच्या नेतृत्वात जिंतूर व सेलू विधानसभा मतदारसंघातून तसेच सेलू शहरातून मोठे मताधिक्य देऊ. अशी ग्वाही शहरातील नेत्यांनी यावेळी दिली. साईबाबा नागरी बँकचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक काकडे, राजेंद्र लहाने, रामनाना पाटील, रणजीत गजमल, रमेश डख,  माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, सुधाकर रोकडे, संजय साडेगावकर, शैलेश तोष्णीवाल, सुधाकर पवार, मिलिंद सावंत, विनोद तरटे, इरफान जमीनदार, मुक्तार खान, इमतियाज खान, मनिष कदम, शेख दिलावर, मिलींद पवार , विशाल देशमुख, मजीद बागवान, शेख समीर, गौस लाला आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यानिमित्ताने माजी आमदार विजयराव भांबळे म्हणाले, की आपले कार्य हीच आपल्या लोकप्रियतेची पावती असते. खासदार संजय जाधव  हे कर्तृत्ववान आणि निष्ठावान खासदार आहेत. येत्या २६ तारखेला ‘मशाल’ या चिन्हासमोरील बटन दाबून जाधव यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन भांबळे यांनी केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!