परभणी लोकसभा : मतदानासाठी यंत्रणा सज्ज; २२९० मतदान पथके रवाना : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

परभणी लोकसभा : मतदानासाठी यंत्रणा सज्ज; २२९० मतदान पथके रवाना : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

पोलिसांसह ११ हजार ४५० अधिकारी, कर्मचारी नियुक्त, ४७ संवेदनशील मतदान केंद्रे, १ हजार १४५ मतदान केंद्राचे वेबकास्टिंग होणार

परभणी लोकसभा मतदार संघात यावेळेस मतदान ७५ टक्क्यांवर घेवून जायचे आहे. त्यामुळे नव मतदारांसह सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून, लोकशाहीच्या या महाउत्सवात सहभागी व्हावे आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.

परभणी लोकसभा : मतदानासाठी यंत्रणा सज्ज; २२९० मतदान पथके रवाना : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

परभणी : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने १७-परभणी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी, २६ एप्रिलरोजी मतदान होणार आहे. ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी एकूण २२९० केंद्रावरील मतदान पथके गुरूवारी रवाना झाली असून मतदार संघातील सर्व मतदान केंद्रे व यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली. ९६-परभणी विधानसभा मतदार संघातील ३३३ मतदान अधिकाऱ्यांची पथके जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत मतदान केंद्राकडे रवाना झाली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दत्तु शेवाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणविरकर, प्रा.गणेश शिंदे यांची उपस्थिती होती. मतदानाच्या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त राहणार असून, संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष राहणार आहे. परभणी लोकसभा मतदार संघात एकूण २ हजार २९० मतदान केंद्रे आहेत. यामध्ये जिंतूर विधानसभा मतदार संघात ४२४ मतदान केंद्र तर परभणी ३३३, गंगाखेड ४३२, पाथरी ३९८, परतूर ३५० आणि घनसावंगी मध्ये ३५३ मतदान केंद्रे आहेत. यात सहाय्यकारी मतदान केंद्रांचाही समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री.गावडे यांनी यावेळी दिली. या ठिकाणी क्षेत्रीय अधिकारी, मतदान पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, ही पथके देखील मतदान केंद्रावर रवाना झाली आहेत. मतदान पथकांसोबत प्रथोमपचार वैद्यकीय किट, ओआरएस आदी औषधी दिली आहेत.

१४ महिला मतदान केंद्रे

परभणी लोकसभा मतदार संघात १४ महिला मतदान केंद्रे असणार आहेत. त्यामध्ये जिंतूर, परभणी, परतूर आणि घनसावंगी विधानसभा मतदार संघात प्रत्येकी दोन, तर गंगाखेड आणि पाथरी मतदार संघात प्रत्येकी तीन महिला मतदान केंद्र असणार आहे. तसेच दिव्यांग ९ आणि युथ १३ मतदान केंद्रे असणार आहे. मतदान संपल्यानंतर सर्व मतदान पथके संध्याकाळी वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ, परभणी येथील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्ट्रॉंगरुममध्ये निवडणूक निरिक्षक, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, उमेदवार, प्रतिनीधी यांच्या उपस्थितीत सर्व मतदान यंत्र सिलबंद केली जाणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी यावेळी दिली.

परभणी लोकसभा : मतदानासाठी यंत्रणा सज्ज; २२९० मतदान पथके रवाना : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

पोलिसांसह ११ हजार ४५० अधिकारी, कर्मचारी

परभणी लोकसभा मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया शांतता आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी २ हजार २९० मतदान केंद्रावर पोलीस कर्मचाऱ्यांसह ११ हजार ४५० अधिकारी, कर्मचारी यांची नेमणुक करण्यात आली आहे. शिवाय १ हजार १४५ कर्मचारी राखीव आहेत. तसेच केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, संवेदशील मतदान केंद्रावर अधिकचे पोलिस मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

४७ संवेदनशील मतदान केंद्रे

परभणी लोकसभा मतदार संघात एकूण ४७ संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. यात ९५-जिंतूर विधानसभा मतदार संघात १०, ९६-परभणी ८, ९७-गंगाखेड १७, ९८-पाथरी ७, ९९-परतूर ३ आणि १००-घनसावंगी विधानसभा मतदार संघात २ संवेदशील मतदान केंद्रे आहेत. या सर्व केंद्रांवर विशेष लक्ष राहणार असून, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात राहणार आहे. यातील सुमारे १ हजार १४५ मतदान केंद्राचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!