डॉ.शिवाजी शिंदे यांचा ‘विद्या वाचस्पति सारस्वत सन्मान’ ने गौरव
परभणी : सेलू येथील नूतन कन्या प्रशालेतील सेवा निवृत्त ग्रंथपाल डॉ.शिवाजी शिंदे यांना दीनदयाल उपाध्याय हिन्दी विद्यापीठ, वृन्दावन धाम, मथुरा यांच्या वतीने २४ एप्रिलरोजी भोपाळ येथे आयोजित समारंभात विद्या वाचस्पति सारस्वत सम्मानने गौरविण्यात आले. याप्रसंगी सेवानिवृत्त न्यायाधीश देवेन्द्र कुमार जैन, कुलगुरु डॉ. इन्दु भूषण मिश्रा “देवेन्दु” पं.धीरेन्द्र चतुर्वेदी, विष्णुकांत कनकने, डॉ. विश्वनाथ पाणिग्रहिजी, दीपा मिश्रा आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. सन्मानाबद्दल डॉ.शिंदे यांचे विविधस्तरांतून स्वागत होत आहे.