परभणी लोकसभा : मतदारसंघात ६२.२६ टक्के मतदान; मतदान यंत्रे स्ट्राँगरुममध्ये सीलबंद

परभणी लोकसभा : मतदारसंघात ६२.२६ टक्के मतदान; मतदान यंत्रे स्ट्राँगरुममध्ये सीलबंद

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी : ९५-जिंतूर विधानसभा मतदार संघात ६२.४३ टक्के, तर ९६ – परभणी ६२.६२ टक्के, ९७‌ – गंगाखेड, ६३.०० टक्के, ९८-पाथरी ६४.२७ टक्के, ९९-परतूर ५९.६० टक्के आणि १००- घनसावंगी विधानसभा मतदार संघात ६०.९३ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

परभणी : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात परभणी लोकसभा मतदार संघासाठी शुक्रवारी, २६ एप्रिल रोजी मतदान शांततेत व सुरळीत पार पडले. परभणी लोकसभा मतदारसंघात एकूण ६२.२६ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी शनिवारी दिली.

परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघातील २ हजार २९० मतदान केंद्रातून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यामध्ये ९५-जिंतूर विधानसभा मतदार संघात ६२.४३ टक्के, तर ९६ – परभणी ६२.६२ टक्के, ९७‌ – गंगाखेड, ६३.०० टक्के, ९८-पाथरी ६४.२७ टक्के, ९९-परतूर ५९.६० टक्के आणि १००- घनसावंगी विधानसभा मतदार संघात ६०.९३ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

मतदान यंत्रे स्ट्राँगरुममध्ये सीलबंद

परभणी लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान यंत्र कडक सुरक्षेत वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ, परभणी येथील कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्ट्राँगरुममध्ये सुरक्षितरित्या आणण्यात आले. यावेळी निवडणूक आयोगाचे निरिक्षक कृष्णकुमार निराला, जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्क्रुटणी प्रक्रिया करून सर्व मतदान यंत्र स्ट्राँगरूममध्ये सुरक्षित सीलबंद करण्यात आली.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!