सय्यद अरमान, रुद्र घुलेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश; केशवराज बाबासाहेब विद्यालयातर्फे सत्कार

सय्यद अरमान, रुद्र घुलेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश; केशवराज बाबासाहेब विद्यालयातर्फे सत्कार

प्रतिनिधी, सेलू : अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील सय्यद अरमान व रुद्र घुले यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे वतीने आयोजित पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करून ते पात्र झाले आहेत. सय्यद अरमान याचे वडील भाजीपाला व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात तर रुद्र घुले याचे वडील एक छोटीशी दुकान चालवून आपले कुटुंब सांभाळतात पण त्यांच्या पाल्यांनी अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश मिळवले आहे त्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. श्री केशवराज शिष्यवृत्ती पॅटर्नचे हे यश आहे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व शाळेने २५ सराव परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची उत्तम तयारी घेतली अशी प्रतिक्रिया सय्यद अरमान याचे पालक सय्यद अली यांनी व्यक्त केली. शाळेच्या वतीने या दोन्ही विद्यार्थ्यांना घरी जाऊन पालकांसह सन्मानित करण्यात आले. या विद्यार्थ्यांना शाळेतील कृष्णा पांचाळ,अमिता जवळेकर, कीर्ती कुलकर्णी, शुभांगी भाग्यवंत, सर्जेराव सोळंके, प्रवीण चव्हाण व शिष्यवृत्ती विभाग प्रमुख योगेश ढवारे यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड अनिरुध्द जोशी, सचिव महेशराव खारकर, उपाध्यक्ष डॉ. सुनील कुलकर्णी, सहसचिव अभय सुभेदार, कोषाध्यक्ष ललित बिनायके, सदस्य जयंत दिग्रसकर, विष्णू शेरे, डॉ.प्रवीण जोग, प्रवीण माणकेश्वर, रामेश्वर राठी, ॲड. किशोर जवळेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बालासाहेब हळणे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके, जेष्ठ शिक्षक दिलीप बेदरकर, संजय धारासुरकर, नरेश पाटील आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!