मुख्याध्यापक प्रदीप कौसडीकर यांचा सेवागौरव; केशवराज बाबासाहेब विद्यालयात कार्यक्रम
प्रतिनिधी, सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप कौसडीकर यांचा सेवानिवृत्तीच्या निमित्ताने मंगळवारी, ३० एप्रिल रोजी सेवा गौरव करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ॲड.अनिरुध्द जोशी, सचिव महेश खारकर, सदस्य जयंत दिग्रस्कर, डॉ.प्रवीण जोग, विष्णू शेरे, प्रवीण म्हणकेश्वर, प्राथमिक विभाग मुख्याध्यापक बालासाहेब हळणे, माध्यमिक विभाग मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके, माजी मुख्याध्यापक दत्तात्रय नागरे, सत्कार मूर्ती प्रदीप कौसडीकर, पल्लवी कौसडीकर, शेषराव कौसडीकर, शोभा कौसडीकर आदींची उपस्थिती होती. या प्रसंगी प्रदीप कौसडीकर यांचा सपत्नीक संस्थेच्या व शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, साडी, चांदीचा पेला देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विविध संस्था व व्यक्तींच्या वतीने कौसडीकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक दिलीप बेदरकर सूत्रसंचालन योगेश ढवारे यांनी केले. कृष्णा पांचाळ यांनी आभार मानले. यावेळी विविध संस्था व व्यक्तींच्या वतीने कौसडीकर यांचा सत्कार करण्यात आला