सीमा सुरक्षा दलाचे संतोष शेळके यांचे सेलूमध्ये जल्लोषात स्वागत
सेलू जि.परभणी : सीमा सुरक्षा दल व एनएसजी कमांडो म्हणून २१ वर्ष देश सेवा बजावलेले सेलूचे भूमिपुत्र संतोष उध्दवराव शेळके या जवानाचे मंगळवारी, सात मेरोजी सेलू रेल्वे स्थानकावर जोरदार स्वागत करण्यात आले; तसेच ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. रेल्वे स्थानक ते शास्त्री नगरातील अष्टविनायक गणपती मंदिरापर्यंत जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. भारत माता की जय, वंदे मातरम घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. गटकळ करिअर अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले. यानिमित्ताने आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, उद्योजक जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, संतोष कुलकर्णी, मनीष कदम, प्रभाकर सुरवसे, जयसिंग शेळके, राजेंद्र पवार, साईराज बोराडे, रघुनाथ देशमुख, माधव लोकुलवार, प्रसाद खारकर आदींसह गटकळ करिअर अकॅडेमी, वकील संघ, डॉक्टर संघ, शिक्षक, राजकीय नेते, व्यापारी संघ, माजी सैनिक संघासह विविध स्तरातील व्यक्ती, संस्थांच्या वतीने शेळके यांचा सत्कार करण्यात आला. नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.