भगवान श्री परशुराम जन्मोत्सव : सेलूमध्ये शुक्रवारी भव्य शोभायात्रा; विविध सांस्कृतिक कार्यक्रम 

भगवान श्री परशुराम जन्मोत्सव : सेलूमध्ये शुक्रवारी भव्य शोभायात्रा; विविध सांस्कृतिक कार्यक्रम 

प्रतिनिधी, सेलू दि. ८ : भगवान श्री परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त श्री परशुराम जन्मोत्सव समिती व सर्व शाखीय व बहुभाषिक ब्राह्मण समाज बांधवांच्या वतीने भगवान श्री परशुराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शुक्रवारी, १० मेरोजी भव्य शोभा यात्रा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने श्री गायत्री माता मंदिरात शुक्रवारी सकाळी सात वाजता भगवान श्री परशुराम यांना महाअभिषेक, सायंकाळी पाच वाजता भव्य शोभायात्रा, रात्री साडे आठ वाजता श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरात महाआरती आहे. शोभायात्राचे प्रमुख आकर्षण भगवान श्री परशुराम यांची भव्य मूर्ती, भव्य परशुअस्त्र, श्री भगवान परशुराम यांची पालखी, श्री भगवान परशुराम यांचा सजीव देखावा, बाजीराव पेशवे व काशीबाई यांचा सजीव देखावा, ढोल व ताशा पथक, महिला भजनी मंडळांचा सहभागी होणार आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, शोभायात्रा व विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक श्री परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Please Share

One thought on “भगवान श्री परशुराम जन्मोत्सव : सेलूमध्ये शुक्रवारी भव्य शोभायात्रा; विविध सांस्कृतिक कार्यक्रम 

  1. भव्य दिव्य परशुराम जयंती निमित्त सर्व ब्राह्मण समाज बांधवांना खूप खूप शुभेच्छा 🎉💐! जय परशुराम जय जय परशुराम जय परशुराम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!